Sunday, 9 October 2016

*श्रवण व संभाषण विकसनासाठी*

*गोष्ट*-
मुलांना विविध गोष्टी ऐकविणे,
यात हावभाव व कृती चा सहभाग आवश्यक आहे,

*सुरुवातीला मनोरंजक व गमतीशीर गोष्टीचे मुलांसमोर सादरी करण आवश्यक आहे.

यासाठी आपण व्हिडीओ चा वापर प्रभावी ठरत आहे,
त्यामुळे मुल संवाद,
अभिनय, नाट्यीकरणाकडे वळत आहे,
म्हणून गोष्टीचे व गाण्याचे व्हिडीओ प्राप्त करुन ते मुलांना दाखवणे आवश्यक आहे,

*मुल भयमुक्त व निर्भिड होण्यासाठी,*
शिक्षकांनी त्यांच्या समोर कृतीतून बडबड गीत सादर करुन मनोरंजक वातावरण तयार करणे आवश्यक,

*बडबड गीत-
छोटे हवे ,
खूप मोठे नको,
एकाचा शब्दाचा पूर्नवापर होईल व तो शब्द सारखे यमक जुळणारा असेल असा हवा,
*जसे-
वाटाणा-टणाटणा
फुटाणा-
लठ्ठ -मठ्ठ
अडगुलं-मडगुलं

*तसेच गोष्ट निवडतांना कृतीला वाव असेल व मुलांना ऐकणे मनोरंजक वाटेल असेल अशी गोष्ट निवडून कृतीसह सादरी करण आवश्यक आहे,
जसे-
भोपळ्याची-
पुन्हा असणारे वाक्य बोलतांना मुलांना गमंत वाटते,
ससा व कासवची गोष्ट सांगत असतांना ,
गाजर,मुळा,भाजीपाला खातांना येणार आवाज या गोष्टी मुलांना गंमतीशीर वाटतात.
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*----------------------------*

No comments:

Post a Comment