Sunday, 16 October 2016

माझे काव्य माझी रचना----मी

*मी*
मीच मला कळले नाही,
मी न जाणिल्या भावना ही,
अट्टाहास केला मी जगण्याचा,
परि मला तू जगविलेच नाही ||

केलास अपमान ह्या जन्माचा,
मानले ना तू मला कधी ही,
धाकात राहिले,कष्टात जगले,
बदल कसा तो घडलाच नाही ||

विविध रुपाने सामोरी आले,
विविध रुपात तू ही धाकविले,
कधी न जाणिले मला तरी ,
मी तुझ्या च साठी जीवन जगले. ||

न माझा श्वास मोकळा,
न कधी मी जगले मोकळी,
नित्य सतावतो सवाल मजला,
अस्तित्व माझे ,मलाच न कळी ||

मला नको तू मानूस देवता,
नको मला तू बनवू दासी,
माणूस आहे,माणूस असू दे,
जगू दे,फुलू दे,बहरु दे आता तरी ||
*------------------------------*
*✍🏻शब्दरचना*

*सौ.जया नेरे(पाटील)*
नंदुरबार

No comments:

Post a Comment