Sunday, 9 October 2016

केंद्रस्तरीय शिक्षणपरिषद-केंद्र-भालेर----स्थळ--जि.प.केंद्रशाळा,भालेर,ता.जि.नंदुरबार

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*मा.आदरणिय डॉ.सी.के.पाटील साहेब,गटशिक्षणाधिकारी,पं.स.नंदुरबार*
यांच्या सुनियोजनाने ,
*आदरणिय श्री.आबासो,श्री.वसंत पाटील सर*
यांच्या मार्गदर्शनाने,

*केंद्रस्तरीय शिक्षणपरिषदेचे आयोजन*
*दि-५/१०/२०१६*

*केंद्र-भालेर ,ता.जि.नंदुरबार*

*स्थळ-जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार*

केंद्रीय शिक्षण परिषदेत ,
*मा.आदरणिय केंद्रप्रमुख-*आबासो,श्री.वसंत पाटील सर,
यांनी ज्ञानरचनावादी पध्दती व भेटी दिलेल्या शाळेतील सद्यस्थिती याबाबत मार्गदर्शन केले,

प्रगत वर्ग/ शाळा या दृष्टीने योग्य दिशेने जाण्याविषयी मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली,
सर्व शिक्षकांचा प्रतिसाद चांगला होता.

यजमान शाळेतील इ.४थीच्या मुलांनी बालसभा कशी घ्यावी या विषयी सादरीकरण करुन दाखवले,

जि.प.केंद्रशाळा ,भालेर येथिल
*मुख्याध्यापक-सौ.जया नेरे ,*
यांनी तीन वर्षापूर्वीची शाळा व आजची स्थिती पर्यंतचा प्रवास ppt द्वारे सादर केला,

प्रगत वर्ग /शाळा दृष्टीने वाटचाल करतांना करत असलेले प्रयत्न ,

घेत असलेले उपक्रम,
मिळणारा प्रतिसाद,

बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे मुल नेतांना कोणत्या उपक्रमाचा,

साधनाचा सकारात्मक परिणाम दिसतोय,

या विषयी मुद्दे मांडले,

डिजीटल इंटरअँक्टिव्ह साठी मिळवलेला लोकसहभाग या विषयी ही,

विविध उपक्रमांचे ppt द्वारे सादरी करण केले,

*जि.प.शाळा,होळ तर्फे रनाळा,*
*शाळेचे मुख्याध्यापक-श्री.ठाकरे सर,*
यांनीही ppt द्वारे शाळेची प्रगती,
डिजीटल शाळेसाठी झालेले प्रयत्न या बाबत सादरीकरण केले.

*शिक्षण परिषदेस मा.आदरणिय श्री.डॉ .सी.के.पाटील साहेब,*
गटशिक्षणाधिकारी,पं.स.नंदुरबार ,

यांनी भेट देवून प्रगत शाळेविषयी उपस्थित शिक्षकांना प्रेरक मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या सकारात्मक कामांचा विशेष उल्लेख करुन प्रोत्साहन दिले.

केंद्रातील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्वक यशोगाथा कार्डपेपर वर लिहून आणली,

ती यशोगाथा सर्वांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

त्यावर प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

एक छोटासा खेळ घेवून शिक्षणपरिषदेची सांगता करण्यात आली.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*चला चला होऊ या गोळा,*
*भरवू या शिक्षण मेळा,*

*इतका लावा बाळाला लळा,*
*की बोलू लागेल शाळेची शिळा न् शिळा ||*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

No comments:

Post a Comment