**********
चला-गाऊ-या-गाणी
***************
!!नमस्कार!!
!! मी जया नेरे ((पाटील) !!- नवापूर -नंदुरबार
!! मी आपणा समोर घेऊन येत आहे,!! ♻ !!माझी शाळा माझे उपक्रम, अंतर्गत!!
!! चला गाऊ या गाणी !! � � !! ध्यास आमुचा गुणवत्ता !!
〰〰〰〰〰〰〰〰
!! प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र !!
!! पुढील शै.वर्षात विद्यार्थी अनियमित होऊ नये म्हणून इ.१ली पासून शाळेत घ्यावयाचा उपक्रम.!!
========================
🎤🎺🎤🎺-उपक्रमाचा उद्देश --
🎼 शाळेविषयी गोडी,आवड निर्माण होते,शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होते, जवळीकता निर्माण होते, शिक्षकाबद्दल भिती मनात रहात नाही, शाळेत खेळीमेळीचे ,मनोरंजक वातावरण तयार होते.
🎤--गाण्याविषयी थोडेसे..--
********** संगीताची आवड सर्वांना लहानपणापासून असते. मूल जन्माला आल्यापासून आई त्याच्याशी बोलतांना ताल-लय यांचा उपयोग करुन बोलत असते. त्याला अंगाई गीताने निजवते. त्याला थोपटण्यातही ताल असतोच. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या हालचाली प्रमाणेही गाणी वेगळ्या प्रकारची व वेगळ्या ठेक्यात म्हटली जातात. म्हणजेच जन्मापासून या सूर, ताल, लय, ठेका ,यांची त्याच्या कानांना सवय होत असते.
🎺**घरातून शाळेत आलेले बालक हे भिऊ नये, त्याला घरासारखे वाटावे, त्याचे मनोरंजन व्हावे,मत्याला स्थिरपणा यावा व ते शाळेत रमावे यासाठी गाणी हा उपक्रम फार उपयोगी पडतो.अशा गाण्यांमुळेच मुलांना शाळेची गोडी लागते.
**भाषा विकास होण्यास गाण्याची फार मदत होते. गाण्यातील शब्द परिचयाचे होतात आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. गाणी ऐकून ऐकून पाठ होतात. अभिनय गीतातून त्याच्या अनुकरणाला वळण लागते, चांगला अभिनय करता येतो, त्याला हे सर्व जमले म्हणजे आनंद होतो.त्याच्या अहंप्रवृत्तीचे समाधान होते. नवनिर्मितीचा आनंद मिळतो.
🎹गाण्याची निवड---
🎤**वयोगटानुसार गाण्याची योग्य निवड असायला हवी. त्यातील शब्द सोपे असावेत. ही गाणी आकाराने लहान असावीत.चाल सोपी व आकर्षक आणि लयबध्द ठेक्यात असावी. मुलांना ते चटकन म्हणता आले पाहिजे. गाण्याचा विषय मुलांच्या परिचित जीवनातला असला पाहिजे, म्हणजे ती गाणी मुलांना आवडतात. गाण्यासाठी साथीला संवादिनी, ट्रँगल, खंजिरी, घुंगरु,यझांजवगैरे साधनांची आवश्यकता असते.त्यामुळे न कळत मुलांना ताला सुराचे ज्ञान होते. साथसंगतीमुळे गाण्याला उठाव येतो व मुलांच्या मनोरंजनाचा हेतू साध्य होतो. गाण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यांचा आलटून पालटून रोज उपयोग करता येतो व त्यामुळे कंटाळवाणे होत नाही.----
〰〰〰〰〰〰
========================
🎤गाण्यांचे प्रकार---🎤
१)प्रार्थना--भजन
२)बडबड गीत
३)अभिनय गीत
४) नृत्यगीत
५)सैनिक गीत
६)खेळगीत
७)बालभावगीत
८)प्रासंगिक गीत
९)राष्ट्रगीत
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📢 --ऐका हो ऐका ---📢
🎼 **छान छान गाणी ऐका
चिमणीचं गाणं ऐका
मोराचं गाणं ऐका ||
🎺**बडबड गीताला हवा ठेका
सैनिक गीताला ट्रँगल हवा
नृत्याला घुंगरु तशी खंजिरी ||
🎸**व्हायोलिन सतार मध्ये बासरी
साथीला आहेत वाद्य सारी
पेटीला सूर धरा
तबल्याचा ठेका धरा ||
🚣**झुकझुक गाडी ठेक्यात
विमान बोट पाण्यात |
ऐका हो ऐका नवी गाणी
पाठ करा म्हणा गाणी |
========================
१)प्रार्थना गीत-🎤
🎹**आपण जीवनात कोणतेही काम करतांना अगोदर देवाला नमस्कार करुन सुरुवात करतो. त्याची ही पूर्व तयारी. प्रार्थना किंवा भजनाची भाषा व चाल पण सोपी हवी.
🙏- प्रार्थना ---🙏
🎼**हात दोन पाय दोन डोळे दोन दिले ,
काय मागू देवा तुला सारे मला दिले !!धृ!!
🎹**सरींच्या हातांनी देवा आशिर्वाद लाभे,
मोराच्या पिसात देवा रुप तुझे शोभे,
डोळ्यांना तू बागेतली दाखवितो फुले, !!१!!
🎤**झरा वाहे झुळझुळ तुझेच ते गाणे,
पाखरांची किलबिल तुझेच तराणे,
दिव्य तुझी छाया आम्ही तुझीच रे मुले !!२!!
🙏***हातांना दे सेवा आणि पायांना दे गती
तुझी लाभो ज्ञान दृष्टी मनास संमती,
मागण्याच्या आधी देवा न मागता दिले !!३!!
🎤**काय मागू देवा तुला सारे मला दिले,
हात दोन पाय दोन डोळे दोन दिले
काय मागू देवा तूला सारे मला दिले !!४!!
========================
🔷 सूचना --: या प्रार्थना गीतास आपण आपल्या पद्धतीने चाल लावून समुहात पाठवू शकता. सर्व सदस्यांना फायदेशीर ठरेल.
========================
====================
--भजन --🙏
🎤**भजन घेण्याचा हेतू म्हणजे मन स्थिर होणे.भजनाची भाषा सोपी असावी. चाल सोपी असावी.भजन म्हणतांना टाळीचा ठेका विशिष्ट पध्दतीने घ्यावा.
🔰**धृवपदासाठी-जसे- उजव्या हाताला टाळी घेतांना ,उजव्या हाताचा तळव्यावर डाव्या हाताने टाळी द्यावी व डाव्या बाजूला डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने टाळी द्यावी.कडव्या साठी-डोक्यावर टाळी व खाली टाळी द्यावी.
========================
� �भजन--
१) डोक्यावर चांदोबा आणि गंगा,
जटाधारी देवाचे नाव सांगा........!!धृ!!
**हातात कमंडलू दिसते छान,
नागोबाच्या फण्यान झाकली मान...!!१!!
**शंख ,डमरु ,त्रिशुल लांब ,
वल्कले नेसतो भोळा सांब.............!!२!!
**डोक्यावर चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा !!३!!
=========================
💢♻💢♻💢♻💢
*---------------------------------*
*🏡माझी शाळा माझे उपक्रम*
*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*
*----------------------------------*
*आषाढी एकादशीचे औचित्य साधून*
*लहान बालकांसाठी भजन गीत*
*---------------------------------*
*भजन*
सावळ्या हरी मला पंढरी जाऊ दे,
येता जाता विठोबा पाहू दे ||धृ||
विठोबाला वाहिला बुक्का,घृ
भजन करि ना तो एक मुका ||१||
सावळ्या ........
विठोबाला वाहिली तुळशी,
भजन करि ना तो एक आळशी ||२||
सावळ्या........
विठोबाला वाहिल्या लाह्या,
भजन करि ना त्या आयाबाया ||३||
सावळ्या.......
विठोबाला वाहिला पेढा,
भजन करि ना तो एक वेडा ||४||
सावळ्या.......
-----------------------------------------------------------♻💢♻💢♻💢♻💢♻
२)भजन--
**म्हणा गोविंद गोविंद गोविंद !!धृ!!
यमुना तीरी वाजवी बासरी !
बासरी देई आनंद !!१!!
**गोपी श्रीहरी खेळत होरी !
होरीत रंगला श्रीरंग !!२!!
**हाती टिपरी मुरली अधरी !
पैंजण पायी नाचे मुकुंद !!३!!
**गोविंद गोविंद ऐसा छंद !
छंदात झाले मन धुंद !!४!!
=======================
♻टिप- :भजन गीताला आपल्या आवडीची चाल लावून समुहात टाका. जेणेकरुन सर्वांना त्याचा लाभ होईल.
=======================
========================
🎭 --बडबड गीत---🎭
***हा प्रकार मुलांच्या जवळचा वाटणारा आणि फार आवडणारा आहे.कारण मुले सारखी बडबड करितच असतात. तीच बडबड जरा ठेक्यात किंवा तालावर म्हटली की बडबड गीत होते.
🎺**अनुप्रास आणि यमक जुळल्यामुळे मुलांना उच्चाराची गंमत वाटते. या बडबड गीतांना अर्थ असतोस असे नाही. बडबड गीते केव्हाही म्हणता येतात.
😊(बडबड गीत म्हणतांना मोठ्या व हळू आवाजात म्हणणे, हळू म्हटल्याने काळजीपूर्वक शब्द ऐकण्याची सवय लागते व मुलांना गंमत वाटते.)
======================= ----------बडबडगीत-----------🎤
**खारु ताई छोटीशी, आहे का माहित!
राही कोठे सांगु का,झाडाच्या ढोलीत!!
**फिरे कशी सांगु का,छत्री घेऊन शेपटीची! पांघरते अंगावर शाल ,काळ्या पट्ट्यांची!! 📢
========================
-----------बडबडगीत------------🎤
**दोन लहान उंदीर विणायला बसले!
विणायला बसले, विणायला बसले!
हळूच मांजर डोकावले !! (ओळ-२वेळा)
***तुम्ही काय करता रे उंदरांनो,रे उंदरांनो,रे उंदरांनो!
मुलांसाठी कपडे विणतो.(ओळ-२वेळा)
🐱**आम्ही यावे का मदत कराया ,मदत कराया, मदत कराया!!
***नको नको माऊ ताई डोकं उडवाल!! २- वेळा🎼
========================
🎤 ---बडबडगीत----------🎤
३)भटजी गेले नारळ आणायला,नारळ आणायला, नारळ आणायला!
🎺**तीन रुपयाला एक नारळ
**दोन रुपयाला, देरेबाबा, देरेबाबा, देरेबाबा! **भटजीबुवा जा बंदराला !!
**भटजी गेले बंदराला, बंदराला, बंदराला !
**दोन रुपयाला एक नारळ !
**एक रुपयाला देरे बाबा,
देरे बाबा,देरे बाबा !!
* **भटजी बुवा जा कोकणात भटजी गेले कोकणात,
कोकणात,कोकणात.!!
****एक रुपयाला एक नारळ !!
🌴**फुकट देरे माझ्या राज्या,
माझ्या राज्या,माझ्या राज्या !!
भटजीबुवा जा झाडावर !
भटजी गेले झाडावर, झाडावर, झाडावर !! धपकन पडले विहिरीत!!📢
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------〰〰〰〰〰〰〰〰〰
----बालभावगीत----
**मुलांच्या मनोव्यापाराचे सुंदर दर्शन बालभावगीतातच असते आणि ते मुलांना सहज समजते आणि आवडते.
---बालभावगीत ---🐭
१)ए आजी मी तुझ्याशी खेळेन ग !!धृ!!
🏡**हंड्यावरती तपेलं,चुलीवरती पातेलं
तुझं माझं घरकुल मांडीन ग !!१!!
🎤**दाण्याचा लाडू गुळाची पोळी पोह्याचा भात तुला शिजविन ग !!२!!
🎼**भराभरा जेवीन,अॉफीसला जाईन
येतांना खाऊ तुला आणीन ग !!३!!
🎹**रात्र करु मामाची ,गोष्ट सांगू राजाची
तुझ्या कुशीत मी झोपेन ग !!४!!
========================
**बालभावगीत***🐱
२)छोटे घरकुल, छोटे घरकुल
पहा कशी मांडली कोपऱ्यात चुल !
🎺**तांदुळ होते सात, तांदुळ होते सात !
पण पहा कसा केला पातेली भर भात !
🎤**वाढले पिठले, वाढले पिठले !
पण खर सांगू तोंडाला ना पाणी सुटले !! --------------------------------------------------------------------------------------
========================
🎤------प्रासंगिक गीते -----+-🎤
🎼**सण, समारंभ, ऋतू यांना अनुलक्षून म्हणावयाची ही गाणी असतात.तिळगुळाचे गाणे संक्रांतीला आणि नागोबाचे गाणे नागपंचमीला म्हटले म्हणजे प्रसंगोचित ठरते.🎹
🔰----स्थानिक सण- जसे-----+🔰
***-भुलाबाई, गणपती, अक्षय तृतिया, दिवाळी, होळी या सणानुसार गीताचे गायन केले तर मुलांना अनुभूती मिळते.ती त्यांना आवडते .
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎤--------प्रासंगिक गीत-----------🎤
💠------संक्रांत सण------💠
🎹****आली आली संक्रांत आली ,
नंदू -चंदूची चंगळ झाली !!
***--मुगाची खिचडी लोणकढे तूप,
गुळाच्या पोळ्या खाल्ल्या खूप !!
*****-चुरचुरीत घावन,मसाला धिरडी, लोण्याचा गोळा,ताकाची कढी !!
🍇*****शेंगा ,बोरे ऊस गंडेरी
उठता बसता तिळाची वडी !!
****-हळदीकुंकवाला केळ्यांची लूट
केशर हलवा मूठ मूठ !!
♻*****गोड गोड चिक्कू , हिरवा हिरवा पेरु तिळाच्या लाडवाने खिसा भरु !!
********तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमचे तीळ सांडू नका,
आमच्याशी भांडू नका !! 😊
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🍂 --दसरा---🍂
***आला दस-याचा सण करु या गंमत आपण !!
**आणू आंब्याची पाने लांब करु या तोरणे !!
***लावू घराला तोरणे ,बांधू घट्ट दोरीने !!
घालू सडा रांगोळी,करु या लवकर आंघोळी !!
**खाऊ श्रीखंड पुरी,जाऊ सर्वांच्या घरी !! **आणू आपट्याची पाने ,जाऊ सोने लुटणे !!
**आला दस-याचा सण, नटू या आपण सगळे जण !!
**गंमत जंमत करण्याला, खूप आवडे आम्हाला !!
-------------------------------------------------------------------------------------〰〰〰〰〰
========================
🎭-----अभिनयगीत --------🎭
😎***मुलांच्या आवडीचा हा एक प्रकार. .नकला करण्याची वृत्ती मुलांमध्ये लहानपणापासूनच असते. मुले अनुकरणातून नकला करायला शिकतात. अभिनय गीतात मुलांच्या नक्कल करण्याच्या प्रवृत्तीचे समाधान होते.
🎹**गाण्यातल्या हा अभिनय करायचा असतो.म्हणून प्रथम या गाण्याचा अर्थ कळावा लागतो. त्याचप्रमाणे हालचालीवर ताबा ठेवून अभिनय करावा लागतो.
********म्हणजेच त्याच्या भाषेचा विकास झालेला असावा लागतो. शब्द, वाक्य, गाण्यातील योजना हे सर्व समजून त्याचा अर्थ लक्षात घेवून कृती करावयाची असते. म्हणून अभिनय गीताची भाषा सोपी हवी.स्वयंस्फूर्त अभिनय हाच खरा अभिनय असतो.🎼
========================
🎭 -----अभिनय गीत- -------+🎭
***या रे या सार्यांनो या !
नकलाकारांच्या नकला पहा !!धृ !!
👰****आल्या हो शेजारच्या आजीबाई !
*कंबर ताठ होतच नाही
*काठी टेकीत धापा टाकीत !
*बसे मुलांना गोष्टी सांगत !!१!!
👳**आला हो गावचा पाटीलबुवा !
*जरीचा फेटा बांधलाय पहा
*दिसेना कान, आहे मोठा मान !
*लाल लाल चुटूक जोडा छान !!२!!
📨***पत्र घ्या पत्र आहे कुणी दारात
*पेन्सिल कानावर, पिशवी खांद्यावर !
*राम राम मंडळी निघालो गावभर !!३!!
👮**आला हो देशाचा शूरशिपाई !
***चालण्याची ऐटच भारी
**एक डोळा मिटून नीट नेम धरुन !
**दाखवितो हा बंदुक मारुन !!४!!🎼
------------------------------------------
========================
🎭-----अभिनय गीत------------ 🎭
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🐸टुणटुण टुणटुण बेडूकताई !
डराव डराव बोलत राही
आपण उड्या मारु या
बेडूकताई होऊ या !!१!!
🐰लुसूलुसू लुसूलुसू ससेभाऊ !
कोवळा पाला हाती घेऊ
हिरव्या कुरणी धावू या !
सस्सेभाऊ होऊ या !!२!!
🐘हळूहळू हळूहळू हत्ती डोले!
लांब सोंड मजेत हाले
डोलत डोलत चालू या !
हत्ती दादा होऊ या !!३!!
🦄टपटप टपटप आवाज येई!
घोडेदादा धावत येई
त्याच्या संगे धावू या !
घोडेदादा होऊ या !!४!!
🐬सुरुसुरु सुरुसुरु मासळी होऊ !
पाण्यामध्ये लपूनी राहू
तिच्या संगे पोहू या !
मासळी ताई होऊ या !!५!!
-------------------------------------------------------------------------------------- ****एकगीत*** 〰****हे गीत पद्यात व गद्यात ह्या पध्दतीने म्हणावयाचेआहे.**** 〰***भक् भक् भक् भक् गाडी आली 〰〰〰〰〰〰 ***स्टेशनवरतीगर्दीझाली ***पुरी,कचोरी, शेव, चिवडा, गरम चहा - ***ठंडा ठंडा पानी , ****टण् टण् टण् घंटा झाली -गाडी आली ******************स्टेशनआले -गाडीथांबली **उतरा उतरा उतरा -चढा चढा चढा **या या या बसा बसा बसा *सामानाचीधामधुम हमालझाले घामाघुम आतचाले घुसाघुशी बाहेरचाले पुसापुशी टणटणटण घंटाझाली लालनिशान हिरवेझाले झुक झुक झुक गाडी चाले गाडी आली गाडी गेली तुमची आमची मौज झाली ------- -------------------------------------------------------------------------------------- शब्दांकन/संकलन🔮
✒सौ.जया नेरे(पाटील)-नवापूर - नंदुरबार
- ध्यास आमुचा गुणवत्ता
📝
🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤 〰〰〰〰〰〰〰〰
🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤

No comments:
Post a Comment