Saturday, 15 October 2016

वाचन प्रेरणा दिन/हात धुवा दिन-१५/१०/२०१६

☄☄☄☄☄☄☄☄☄
*जि.प.केंद्रशाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*
दि-१५/१०/२०१६

भारतरत्न डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त
*वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन* उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

*सन्मा.श्री.दिनेश पाटील-*
अध्यक्ष,शा.व्य.समिती,भालेर यांचे हस्ते *प्रतिमेचे पुजन* करण्यात येऊन,

*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम-वाचन कुटी*

 चे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थित-
आदरणिय,श्री.संजय कुवर सर,केंद्र -खोंडामळी
सन्मा.उपसरपंच,श्री.वसंत गावीत
श्री.अशोक पाटील,
श्री.ईश्वर खोंडे,

पदाधिकारी ,शा.व्य.स.सदस्य,
पालक,जेष्ठ नागरीक,माजी विद्यार्थी ,विद्यार्थीनी यांनी वाचनात सहभाग घेतला.

*सुत्रसंचलन-सौ.जया नेरे यांनी केले.*

*श्री.वानखेडे सरांनी*
 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन विषयक माहिती मुलांना दिली.

सर्व विद्यार्थ्यांनी वाचनात सहभाग घेतला,

काही मुलांनी उपस्थितांना चित्रवाचन करुन दाखवले,
चित्रावरुन गोष्ट सांगितली.

*दुपारी मिष्टान्न भोजनात शिरा देण्यात आला.**

*हात-धुवा दिना निमित्त* हात धुण्याचे प्रात्य.दाखविण्यात आले.
मुलांकडूनही हात धुण्याच्या स्टेपस् करुन घेण्यात आल्या.

*श्री.गायकवाड सरांनी* जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व  मुलांना सांगितले .

*केंद्रप्रमुख श्री.कुवर दादांनी*
ही मुलांकडून सहा स्वच्छतेचे संदेश जाणून घेतले.

*मुख्याध्यापक सौ.जया नेरे*
 यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत.
*---------------------------*
*✍🏻शब्दांकन-*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार

☄☄☄☄☄☄☄☄☄


No comments:

Post a Comment