Sunday, 16 October 2016

असा ही एक अनुभव-२०११

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*असा ही एक अनुभव*
*---------------------------------*
*साल होते २०११*-
त्या शाळेवर मी बदली होऊन गेले. मला तिसरीचा वर्ग देण्यात आला.तो वर्ग ज्यांचा होता त्यांनी म्हणे यांना शिकवलेच नाही असे इतर शिक्षक मला सांगू लागली.
madam तुम्ही हा वर्ग का घेतला,
पण आहे तेथून पुढे जाऊ असा विचार करुन अध्यापनास सुरुवात केली.
त्या वर्गातील काही मुलं आठ दिवस झाली तरी वर्गात आली नाही.मी मुख्याध्यापकांना विचारले तर ती मुले भिल्ल वस्तीत राहतात,शाळेत येत नाही,

*गृहभेटी*
मी दुसऱ्या मुलांना घेऊन त्यांच्या घरी गेले.त्यांच्याचङ भाषेत पालकांना समजावले.
काही मुलं अर्धा कि.मी.अंतरावर रहात होती,तेथेही
 गेलो,रस्त्याने पावसात भिजतङङ मुलही सोबत आली.

*मुल शाळेत आलीत*
पण वर्गात येत नव्हती.पटांगणातच रहात,खेळत.
मी पटांगणात त्यांच्या जवळ जायचे,गप्पा करायचे.शै.साहित्य दिले.त्यांना मी जवळची वाटू लागले.

*हळूहळू मुलं ओट्यावर आली*
मी ओट्यावर त्यांच्या साठी मुळाक्षर,अंक अॉईलपेंटने लिहिलीत.भितीवर फळा रंग लावून फळे केलेत.त्यांना लिहिण्यासाठी.रंगकामात मन रमेल म्हणून रंग-स्केचपेन-कागदं पुरवलीत.

*वाचनाकडे*
ओट्यावरील मूळाक्षरांवर खेळातून अक्षर वाचन घेऊ लागली.
सोपे शब्द वाचन घेऊ लागली.
पण त्यांच्या लक्षात राही ना.

*स्वतःचे नाव*
त्यांना स्वतःचे नाव लिहिण्यास शिकवले,मुल मोठी होती म्हणून लेखन लवकर ,ठसठशीत करु लागली.

*वाचनासाठी स्वतःच्या नावाचा वापर*
मला असे वाटत होते कीङ काही चित्र, शब्द यांना अपरिचित वाटतात,म्हणून अक्षर लक्षात रहात नाही,
मी या साठी त्यांच्या नावाचा वापर केला.

*एकीचे नाव*- राजबाई
यातील एक एक अक्षर घेतले.
शिला
सिमा
नाना
दिपक
या प्रकारे मी त्यांना अक्षर ओळख देऊ लागले.
यातून लवकर वाचन त्यांनी अवगत केले.
आधी ५ मुली होत्या.
त्यांच्या मैत्रीणी दुसऱ्या शाळेत होत्या त्या ही ४मुली
माझ्या या प्रयत्नामुळे माझ्या शाळेत आल्यात.
पुढल्या वर्षी वयानुरुपला एक मुलगी त्यांचीच मैत्रिण आली .तिला ही अशाच पध्दतीने अक्षर ओळख करुन दिली.एका वर्षात ही हि मुलगी छान वाचायला लिहायला लागली.
अशा एकूण ९मुलींना मी शाळेच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी झाले.
काही दिवस यांना रोज एकङ चॉकलेट व एक रुपया असे ही वाटप केले.नेहमी लेखन साहित्य पुरवले.
नंतर ह्या मुला मुलींना वर्गात फक्त त्यांचीच जागा म्हणून स्पेशल जागा ठेवली.
*---------------------------------*
*या अनुभवातून*-
मूळाक्षरे लक्षात राहण्याची एक पध्दत मला अवगत झाली.
*--------------------------------*
आज ही वस्तीत गेल्यावर ऐकायला मिळते ताई तुझ्या मुळे आमची मुलं शिकली,शिकत आहेत.

*त्या वेळी अभिमानाने ऊर भरुन आल्याशिवाय रहात नाही*
*----------------------------------*
*अनुभव कथन/शब्दांकन*

सौ.जया नेरे (पाटील)
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

अक्षर फुग्याला नेम लावणे.

🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲

*🎭माझी शाळा माझे उपक्रम*

*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*

*📔आनंददायी शिक्षण*

*🔮उपक्रमाचे नाव*-

*🎈अक्षर फुग्याला नेम लावणे*.

*📍संकल्पना*-

🔸मुळाक्षरे-मराठी-इंग्रजी
🔸अंक-संख्या-मराठी-इंग्रजी
🔸शब्द-मराठी-इंग्रजी
🔸जोडाक्षर युक्त शब्द
🔸यांचा वाचन सराव या खेळाद्वारे होत असतो.
🔸सर्व विद्यार्थी या खेळात खूप उत्साहाने सहभागी होतात.

*🎈साहित्य*-
🔸फळ्याला धरुन ठेवेल अशी गोळी असलेली बंदुक,रंगीत खडू

*🎈कृती*-
🔸फळ्यावर विविध रंगांचे फुगे काढायचे,
🔸व त्यात विविध घटक लिहायचे  -एका वेळी एकच

*🎈जसे*-
🔸मराठी मुळाक्षर,
🔸इंग्रजी मुळाक्षर,
🔸वरील प्रमाणे गरजे नुसार एक एक घटकांच्या दृढीकरणासाठी हा खेळ योग्य वेळी खेळून घेऊ शकतो.

🔸जो विद्यार्थी वाचायचा कंटाळा करत असतो तो देखिल उत्साहाने वाचण्याचा प्रयत्न करतो.

*🎈चला तर अक्षर फुग्याला नेम लावू या* ||
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`~
*✍🏻शब्दांकन*✍🏻
*🙏🏻सौ.जया नेरे (पाटील)*
*नंदुरबार*
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲

मासा गळाला लावणे.

🎀खेळातून शिक्षण🎀      
  -----------------------------                                         🔰चला खेळूया,शिकूया शाळा!                                   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                     🎈मनोरंजक खेळ-🎈  
               
🐟मासा गळाला लावणे🐟 -    

 🐬फिश-कार्डशीटचे लहान मोठे आकाराचे मासे तयार करणे -  
                       
🐳माशांच्या तोंडाला स्टँप्लर पिन मारणे.  
         
 🚣🏿पाँड--टोपली --तिला चमकी कागदाने सजवून तलाव तयार करणे.  
                 
🎣गळ--एक काडी ,काठी(लहान) घेणे,तिला लेस (दोरा)बांधणे,    
                         
🎏लेस ला शेवटी लोहचुंबकाचा तुकडा बांधणे.                                         तयार केलेल्या माश्यांवर  विविध बाबी लिहू शकतो.  
                           
📕मराठी-📕  
                                 
 १)अ ते ज्ञ अक्षर  
                       
 २)साधे शब्द    
                           
 ३)स्वरचिन्हयुक्त शब्द  
               
 ४)जोडाक्षर युक्त शब्द    
               
📗इंग्रज📗 --  
                       
  १)A to Z letters  
           
 २)spellings    
                         
 📙गणित📙  
                                   
  १)अंक   २)गणिती क्रिया    
                         
 📝ह्या विविध बाबी माशांवर लिहिणे.  
             
 ⚜कृती---पाँडमध्ये (तलाव)मासे टाकणे, व गळाच्या साह्याने मासा गळाला लावणे.  
                                   
  ⚜यात लहान मासे किती?  
           
 ⚜मोठे मासे किती?    
                           
⚜ किती मासे गळाला लावले  
                 
 💠ह्या गणिती संकल्पनांची ओळख सुरवातीला देवू शकतो.      
       
♦गळाला लागलेल्या माशावर काय लिहिलय,ते मुलं वाचतात,म्हणून मुलांचे वाचन होते,सराव होतो.    
                             
  🏆ह्या खेळातून मुलांना  आनंद मिळतो.
                           
  🎯सुट्टीतील छंदवर्ग शिबीरात आपण हा खेळ खेळवून शिकण्याचा वेगळा आनंद देवूया.  
                               
🎣चला तर मग मासा गळाला लावू या.
           
✍�शब्दांकन✍�      
                           
 🎀सौ.जया नेरे(पाटील)--नंदुरबार🎀             -------------------------

असा केला अभ्यास -इ.२ री-गणित

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

*🔹माझी शाळा माझे उपक्रम*
*🔸ध्यास आमुचा गुणवत्ता*

*📕असा केला अभ्यास*-
*🔸इयत्ता* -दुसरी
*🔹विषय*-गणित

*🔸विविध प्रकारे संख्या समजणे*.

*🔹संख्येचे दृढीकरण*-

*🔸साहित्य*-
दशक गठ्ठा,सुट्या काड्या,संख्या कार्ड,
मण्यांची माळ

*🔅कृती🔅*-

♦एक- एक विद्यार्थ्याला बोलवले,
त्याला कोणतीही एक संख्या सांगितली ,
ती संख्या विद्यार्थ्यांने,
🔸दशक गठ्ठा व सुट्या काड्या(प्रतिके)
वापरुन दाखवली.

 🔹सांगितलेल्या संख्येचे संख्याकार्ड शोधून दाखवले,

🔸कार्डावरील संख्येचे दशक-एकक रुपात वाचन केले,

🔹संख्येतील दशकाची किंमत सांगितली,

🔸ती संख्या मण्यांच्या माळेवर देखिल दाखवली.

🔹अशा प्रकारे एक संख्या अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना दाखवता आली तर संख्येचे दृढीकरण होण्यास मदत होते.
संख्या मनात पक्की ठसते.

🔸ह्या पध्दतीने रोज विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातोय.
*--------------------------------*
विद्यार्थ्यांना खूप मजा वाटली,अभ्यासाचा ताण जाणवला नाही.पुन्हा-पुन्हा असा अभ्यास करण्याची मागणी करु लागले.
*-----------------------------------*

*✍🏻शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

बादलीत चेंडू टाकणे.

🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
*🔮माझी शाळा माझे उपक्रम*
*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*

*⛹आनंददायी शिक्षण*-

*🕹मनोरंजनातून शिक्षण*

*🎾उपक्रमाचे नाव*-बादलीत चेंडू टाकणे.

*🗑🎾साहित्य* -बादली,चेंडू

*📍कृती*-एका-एका  विद्यार्थ्यांला सुरुवातीला १० चेंडूचे उदिष्ट द्यायचे.

*निष्पत्ती*-
१)गणन

२)चेंडू किती टाकले ?

३)बादलीत किती चेंडू पडले ?

५)बादलीच्या बाहेर किती चेंडू पडले ?

६)बादलीत , बादली बाहेर

कितीने कमी कितीने जास्त ?

७)पेक्षा कमी ,पेक्षा जास्त.

८)मिळविणे-कमी करणे

🔸ह्या गणिती संकल्पना या खेळातून सहज शक्य होतात .
मुलांना खेळता खेळता कळत-नकळत ज्ञान मिळते.

*चला तर* --खेळता खेळता शिकूया  ...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*✍🏻शब्दांकन*✍🏻-
*🙏🏻सौ.जया नेरे (पाटील)*

*जि.प.केंद्र शाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*

🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
*पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*!!
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

माझे काव्य माझी रचना----मी

*मी*
मीच मला कळले नाही,
मी न जाणिल्या भावना ही,
अट्टाहास केला मी जगण्याचा,
परि मला तू जगविलेच नाही ||

केलास अपमान ह्या जन्माचा,
मानले ना तू मला कधी ही,
धाकात राहिले,कष्टात जगले,
बदल कसा तो घडलाच नाही ||

विविध रुपाने सामोरी आले,
विविध रुपात तू ही धाकविले,
कधी न जाणिले मला तरी ,
मी तुझ्या च साठी जीवन जगले. ||

न माझा श्वास मोकळा,
न कधी मी जगले मोकळी,
नित्य सतावतो सवाल मजला,
अस्तित्व माझे ,मलाच न कळी ||

मला नको तू मानूस देवता,
नको मला तू बनवू दासी,
माणूस आहे,माणूस असू दे,
जगू दे,फुलू दे,बहरु दे आता तरी ||
*------------------------------*
*✍🏻शब्दरचना*

*सौ.जया नेरे(पाटील)*
नंदुरबार

Saturday, 15 October 2016

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आनंदोत्सव--१५/१०/२०१६

✨☄✨☄✨☄✨☄✨
🇯 🇦🇾🇦
        🇳  🇪 🇷 🇪
*----------------------------*
*माझी शाळा माझे उपक्रम*

*जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार*
*---------------------------*

 *कोजागिरी पौर्णिमे निमित्त*
*आनंदोत्सवाचे*
आयोजन करण्यात आले.

*दि-१४/१०/२०१६*
रोजी *आनंद बाजाराचे* नियोजन करण्यात आले.
त्यात मुलांनी सर्व *नाश्त्याच्या खाद्यपदार्थांचे दुकान* थाटली होती,
प्रत्येक जण आपल्या दुकानाची जाहिरात करत होते.व आपल्या दुकानाकडे घेणाऱ्यांचे लक्ष  वेधत होते.
 नंतर मुलींनी *रांगोळी* काढण्याचा आनंद घेतला.

*आज दि-१५/१०/२०१६
*गरबा नृत्य,फुगडीचे*  संध्याकाळी आयोजन करण्यात येऊन
*आजचा भुलाबाईच्या गीतांचा शेवटचा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा* दिवस आनंदात साजरा झाला.
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
*✍🏻शब्दांकन-*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
✨☄✨☄✨☄✨☄✨

वाचन प्रेरणा दिन/हात धुवा दिन-१५/१०/२०१६

☄☄☄☄☄☄☄☄☄
*जि.प.केंद्रशाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*
दि-१५/१०/२०१६

भारतरत्न डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त
*वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन* उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

*सन्मा.श्री.दिनेश पाटील-*
अध्यक्ष,शा.व्य.समिती,भालेर यांचे हस्ते *प्रतिमेचे पुजन* करण्यात येऊन,

*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम-वाचन कुटी*

 चे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थित-
आदरणिय,श्री.संजय कुवर सर,केंद्र -खोंडामळी
सन्मा.उपसरपंच,श्री.वसंत गावीत
श्री.अशोक पाटील,
श्री.ईश्वर खोंडे,

पदाधिकारी ,शा.व्य.स.सदस्य,
पालक,जेष्ठ नागरीक,माजी विद्यार्थी ,विद्यार्थीनी यांनी वाचनात सहभाग घेतला.

*सुत्रसंचलन-सौ.जया नेरे यांनी केले.*

*श्री.वानखेडे सरांनी*
 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन विषयक माहिती मुलांना दिली.

सर्व विद्यार्थ्यांनी वाचनात सहभाग घेतला,

काही मुलांनी उपस्थितांना चित्रवाचन करुन दाखवले,
चित्रावरुन गोष्ट सांगितली.

*दुपारी मिष्टान्न भोजनात शिरा देण्यात आला.**

*हात-धुवा दिना निमित्त* हात धुण्याचे प्रात्य.दाखविण्यात आले.
मुलांकडूनही हात धुण्याच्या स्टेपस् करुन घेण्यात आल्या.

*श्री.गायकवाड सरांनी* जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व  मुलांना सांगितले .

*केंद्रप्रमुख श्री.कुवर दादांनी*
ही मुलांकडून सहा स्वच्छतेचे संदेश जाणून घेतले.

*मुख्याध्यापक सौ.जया नेरे*
 यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत.
*---------------------------*
*✍🏻शब्दांकन-*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार

☄☄☄☄☄☄☄☄☄


Friday, 14 October 2016

माझे काव्य माझी रचना

☄☄☄☄☄☄☄☄☄
   🇯 🇦🇾🇦
        🇳  🇪 🇷 🇪
*---------------------------*
*वाचलेस तू जरी*

वाचलेस तू सर्व काही ,
पर मनीचा विचार,
न वाचला कधीही,
सत्य,धर्म,सर्वार्थाचा,
मार्ग दाखव मनास ही ||

वाचलीस आई तू जरी,
परि जाणली न तिची व्यथा तरी?
वाचलेस तू पित्यासही,
जाणले ना कष्टास त्याच्या ही ||

वाचलास शिवराय तू,
परि जाणली ना शिवनीती त्यांची,
वाचलेस संतासही ,
परि वाचली ना शिकवण समतेची,

वाचलेस गांधी बापूस ही,
परि चालला ना अहिंसेच्या पथावरी,
वाचलेस महामानवास ही,
परि आत्मसात केली का घटना तरी?

वाचलेस तू अब्दुल कलामास ही,
परि वाचली का त्यांची उत्तुंग भरारी कधी,
दिन असे हा वाचन प्रेरणेचा,
आत्मसात करील जो आहे त्यांचाच ||
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
*भारतरत्न डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी कोटी कोटी प्रणाम ||*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*वाचन प्रेरणा दिवसाच्या व*
*हात धुवा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ||*
*----------------------------*
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

Sunday, 9 October 2016

*श्रवण व संभाषण विकसनासाठी*

*गोष्ट*-
मुलांना विविध गोष्टी ऐकविणे,
यात हावभाव व कृती चा सहभाग आवश्यक आहे,

*सुरुवातीला मनोरंजक व गमतीशीर गोष्टीचे मुलांसमोर सादरी करण आवश्यक आहे.

यासाठी आपण व्हिडीओ चा वापर प्रभावी ठरत आहे,
त्यामुळे मुल संवाद,
अभिनय, नाट्यीकरणाकडे वळत आहे,
म्हणून गोष्टीचे व गाण्याचे व्हिडीओ प्राप्त करुन ते मुलांना दाखवणे आवश्यक आहे,

*मुल भयमुक्त व निर्भिड होण्यासाठी,*
शिक्षकांनी त्यांच्या समोर कृतीतून बडबड गीत सादर करुन मनोरंजक वातावरण तयार करणे आवश्यक,

*बडबड गीत-
छोटे हवे ,
खूप मोठे नको,
एकाचा शब्दाचा पूर्नवापर होईल व तो शब्द सारखे यमक जुळणारा असेल असा हवा,
*जसे-
वाटाणा-टणाटणा
फुटाणा-
लठ्ठ -मठ्ठ
अडगुलं-मडगुलं

*तसेच गोष्ट निवडतांना कृतीला वाव असेल व मुलांना ऐकणे मनोरंजक वाटेल असेल अशी गोष्ट निवडून कृतीसह सादरी करण आवश्यक आहे,
जसे-
भोपळ्याची-
पुन्हा असणारे वाक्य बोलतांना मुलांना गमंत वाटते,
ससा व कासवची गोष्ट सांगत असतांना ,
गाजर,मुळा,भाजीपाला खातांना येणार आवाज या गोष्टी मुलांना गंमतीशीर वाटतात.
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*----------------------------*

चला गाऊ या गाणी

**********
चला-गाऊ-या-गाणी
***************                


 !!नमस्कार!!  
                                
  !! मी जया नेरे ((पाटील) !!- नवापूर -नंदुरबार  

  !! मी आपणा समोर घेऊन येत आहे,!!  ♻              !!माझी शाळा माझे उपक्रम, अंतर्गत!!  

                 !! चला गाऊ या गाणी !! �                       �     !! ध्यास आमुचा गुणवत्ता !!

〰〰〰〰〰〰〰〰
!! प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र !!
!! पुढील शै.वर्षात विद्यार्थी अनियमित होऊ नये म्हणून इ.१ली पासून शाळेत घ्यावयाचा उपक्रम.!!
========================
    🎤🎺🎤🎺-उपक्रमाचा उद्देश --                          
🎼 शाळेविषयी गोडी,आवड निर्माण होते,शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होते, जवळीकता निर्माण होते, शिक्षकाबद्दल भिती मनात रहात नाही, शाळेत खेळीमेळीचे ,मनोरंजक वातावरण तयार होते.

 🎤--गाण्याविषयी थोडेसे..--

 **********      संगीताची आवड सर्वांना लहानपणापासून असते. मूल जन्माला आल्यापासून आई त्याच्याशी बोलतांना ताल-लय यांचा उपयोग करुन बोलत असते. त्याला अंगाई गीताने निजवते. त्याला थोपटण्यातही ताल असतोच. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या हालचाली प्रमाणेही गाणी वेगळ्या प्रकारची व वेगळ्या ठेक्यात म्हटली जातात. म्हणजेच जन्मापासून या सूर, ताल, लय, ठेका ,यांची त्याच्या कानांना सवय होत असते.

🎺**घरातून शाळेत आलेले बालक हे भिऊ नये,  त्याला घरासारखे वाटावे, त्याचे मनोरंजन व्हावे,मत्याला स्थिरपणा यावा व ते शाळेत रमावे यासाठी गाणी हा उपक्रम फार उपयोगी पडतो.अशा गाण्यांमुळेच मुलांना शाळेची गोडी लागते.
**भाषा विकास होण्यास गाण्याची फार मदत होते. गाण्यातील शब्द परिचयाचे होतात आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. गाणी ऐकून ऐकून पाठ होतात. अभिनय गीतातून त्याच्या अनुकरणाला वळण लागते, चांगला अभिनय करता येतो, त्याला हे सर्व जमले म्हणजे आनंद होतो.त्याच्या अहंप्रवृत्तीचे समाधान होते. नवनिर्मितीचा आनंद मिळतो.

🎹गाण्याची निवड---
🎤**वयोगटानुसार गाण्याची योग्य निवड असायला हवी. त्यातील शब्द सोपे असावेत. ही गाणी आकाराने लहान असावीत.चाल सोपी व आकर्षक आणि लयबध्द ठेक्यात असावी. मुलांना ते चटकन म्हणता आले पाहिजे. गाण्याचा विषय मुलांच्या परिचित जीवनातला असला पाहिजे, म्हणजे ती गाणी मुलांना आवडतात. गाण्यासाठी साथीला संवादिनी, ट्रँगल, खंजिरी, घुंगरु,यझांजवगैरे साधनांची आवश्यकता असते.त्यामुळे न कळत मुलांना ताला सुराचे ज्ञान होते. साथसंगतीमुळे गाण्याला उठाव येतो व मुलांच्या मनोरंजनाचा हेतू साध्य होतो. गाण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यांचा आलटून पालटून रोज उपयोग करता येतो व त्यामुळे कंटाळवाणे होत नाही.----
〰〰〰〰〰〰
========================
🎤गाण्यांचे प्रकार---🎤

  १)प्रार्थना--भजन

  २)बडबड गीत

  ३)अभिनय गीत

  ४) नृत्यगीत

  ५)सैनिक गीत

  ६)खेळगीत

  ७)बालभावगीत

  ८)प्रासंगिक गीत

   ९)राष्ट्रगीत
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📢 --ऐका हो ऐका ---📢

🎼 **छान छान गाणी ऐका
चिमणीचं गाणं ऐका
मोराचं गाणं ऐका ||

🎺**बडबड गीताला हवा ठेका
सैनिक गीताला ट्रँगल हवा
नृत्याला घुंगरु तशी खंजिरी ||

🎸**व्हायोलिन सतार मध्ये बासरी
साथीला आहेत वाद्य सारी
पेटीला सूर धरा
तबल्याचा ठेका धरा ||

🚣**झुकझुक गाडी ठेक्यात
विमान बोट पाण्यात |
ऐका हो ऐका नवी गाणी
पाठ करा म्हणा गाणी |
========================

  १)प्रार्थना गीत-🎤

🎹**आपण जीवनात कोणतेही काम करतांना अगोदर देवाला नमस्कार करुन सुरुवात करतो. त्याची ही पूर्व तयारी. प्रार्थना किंवा भजनाची भाषा व चाल पण सोपी हवी.

      🙏- प्रार्थना ---🙏

🎼**हात दोन पाय दोन डोळे दोन दिले ,
काय मागू देवा तुला सारे मला दिले !!धृ!!

🎹**सरींच्या हातांनी देवा आशिर्वाद लाभे,
मोराच्या पिसात देवा रुप तुझे शोभे,
डोळ्यांना तू बागेतली दाखवितो फुले, !!१!!

🎤**झरा वाहे झुळझुळ तुझेच ते गाणे,
पाखरांची किलबिल तुझेच तराणे,
दिव्य तुझी छाया आम्ही तुझीच रे मुले !!२!!

🙏***हातांना दे सेवा आणि पायांना दे गती
तुझी लाभो ज्ञान दृष्टी मनास संमती,
मागण्याच्या आधी देवा न मागता दिले !!३!!

🎤**काय मागू देवा तुला सारे मला दिले,
हात दोन पाय दोन डोळे दोन दिले
काय मागू देवा तूला सारे मला दिले !!४!!
========================
🔷 सूचना --:  या प्रार्थना गीतास आपण आपल्या पद्धतीने चाल लावून समुहात पाठवू शकता. सर्व सदस्यांना फायदेशीर ठरेल.
========================

====================

             --भजन --🙏

🎤**भजन घेण्याचा हेतू म्हणजे मन स्थिर होणे.भजनाची भाषा सोपी असावी. चाल सोपी असावी.भजन म्हणतांना टाळीचा ठेका विशिष्ट पध्दतीने घ्यावा.

🔰**धृवपदासाठी-जसे-  उजव्या हाताला टाळी घेतांना ,उजव्या हाताचा तळव्यावर डाव्या हाताने टाळी द्यावी व डाव्या बाजूला डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने टाळी द्यावी.कडव्या साठी-डोक्यावर टाळी व खाली टाळी द्यावी.
========================
�      �भजन--

१) डोक्यावर चांदोबा आणि गंगा,
 जटाधारी देवाचे नाव सांगा........!!धृ!!

 **हातात कमंडलू दिसते छान,
 नागोबाच्या फण्यान झाकली मान...!!१!!

 **शंख ,डमरु ,त्रिशुल लांब ,
वल्कले नेसतो भोळा सांब.............!!२!!

 **डोक्यावर चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा !!३!!
=========================
💢♻💢♻💢♻💢
*---------------------------------*
*🏡माझी शाळा माझे उपक्रम*
*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*
*----------------------------------*
*आषाढी एकादशीचे औचित्य साधून*
*लहान बालकांसाठी भजन गीत*
*---------------------------------*
        *भजन*
सावळ्या हरी मला पंढरी जाऊ दे,
येता जाता विठोबा पाहू दे ||धृ||

विठोबाला वाहिला बुक्का,घृ
भजन करि ना तो एक मुका ||१||
सावळ्या ........

विठोबाला वाहिली तुळशी,
भजन करि ना तो एक आळशी ||२||
सावळ्या........

विठोबाला वाहिल्या लाह्या,
भजन करि ना त्या आयाबाया ||३||
सावळ्या.......

विठोबाला वाहिला पेढा,
भजन करि ना तो एक वेडा ||४||
सावळ्या.......

-----------------------------------------------------------♻💢♻💢♻💢♻💢♻
      २)भजन--

**म्हणा गोविंद गोविंद गोविंद !!धृ!!
यमुना तीरी वाजवी बासरी !
बासरी देई आनंद   !!१!!

**गोपी श्रीहरी खेळत होरी !
होरीत रंगला श्रीरंग  !!२!!

**हाती टिपरी मुरली अधरी !
पैंजण पायी नाचे मुकुंद  !!३!!

**गोविंद गोविंद ऐसा छंद !
छंदात झाले मन धुंद   !!४!!
=======================
♻टिप- :भजन गीताला आपल्या आवडीची चाल लावून समुहात टाका. जेणेकरुन सर्वांना त्याचा लाभ होईल.
=======================
========================
🎭     --बडबड गीत---🎭

***हा प्रकार मुलांच्या जवळचा वाटणारा आणि फार आवडणारा आहे.कारण मुले सारखी बडबड करितच असतात. तीच बडबड जरा ठेक्यात किंवा तालावर म्हटली की बडबड गीत होते.

🎺**अनुप्रास आणि यमक जुळल्यामुळे मुलांना उच्चाराची गंमत वाटते. या बडबड गीतांना अर्थ असतोस असे नाही. बडबड गीते केव्हाही म्हणता येतात.

😊(बडबड गीत म्हणतांना मोठ्या व हळू आवाजात म्हणणे, हळू म्हटल्याने काळजीपूर्वक शब्द ऐकण्याची सवय लागते व मुलांना गंमत वाटते.)
=======================           ----------बडबडगीत-----------🎤

**खारु ताई छोटीशी, आहे का  माहित!
राही कोठे सांगु का,झाडाच्या ढोलीत!!

**फिरे कशी सांगु का,छत्री घेऊन शेपटीची!                                                 पांघरते अंगावर शाल ,काळ्या पट्ट्यांची!! 📢
========================
-----------बडबडगीत------------🎤
    **दोन लहान उंदीर विणायला बसले!
 विणायला बसले, विणायला बसले!
  हळूच मांजर डोकावले !! (ओळ-२वेळा)

***तुम्ही काय करता रे उंदरांनो,रे उंदरांनो,रे उंदरांनो!
  मुलांसाठी कपडे विणतो.(ओळ-२वेळा)

🐱**आम्ही यावे का मदत कराया ,मदत कराया, मदत कराया!!
***नको नको माऊ ताई डोकं उडवाल!! २- वेळा🎼
========================
🎤     ---बडबडगीत----------🎤
३)भटजी गेले नारळ आणायला,नारळ आणायला, नारळ आणायला!

🎺**तीन रुपयाला एक नारळ
**दोन रुपयाला, देरेबाबा, देरेबाबा, देरेबाबा!                                                      **भटजीबुवा जा बंदराला  !!

**भटजी गेले बंदराला, बंदराला, बंदराला  !
**दोन रुपयाला एक नारळ !
**एक रुपयाला देरे बाबा,
               देरे बाबा,देरे बाबा  !!

 *            **भटजी बुवा जा कोकणात        भटजी  गेले कोकणात,
                कोकणात,कोकणात.!!
****एक रुपयाला एक नारळ  !!

🌴**फुकट देरे माझ्या राज्या,
          माझ्या राज्या,माझ्या राज्या !!
   भटजीबुवा जा झाडावर !
भटजी गेले झाडावर, झाडावर, झाडावर !!                                                             धपकन पडले विहिरीत!!📢
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------〰〰〰〰〰〰〰〰〰

      ----बालभावगीत----

**मुलांच्या मनोव्यापाराचे सुंदर दर्शन बालभावगीतातच असते आणि ते मुलांना सहज समजते आणि आवडते.

        ---बालभावगीत ---🐭

१)ए आजी मी तुझ्याशी खेळेन ग !!धृ!!

🏡**हंड्यावरती तपेलं,चुलीवरती पातेलं
तुझं माझं घरकुल मांडीन ग !!१!!

🎤**दाण्याचा लाडू गुळाची पोळी पोह्याचा भात तुला शिजविन ग !!२!!

🎼**भराभरा जेवीन,अॉफीसला जाईन
येतांना खाऊ तुला आणीन ग !!३!!

🎹**रात्र करु मामाची ,गोष्ट सांगू राजाची
तुझ्या कुशीत मी झोपेन ग !!४!!
========================
       **बालभावगीत***🐱

२)छोटे घरकुल, छोटे घरकुल
पहा कशी मांडली कोपऱ्यात चुल !

🎺**तांदुळ होते सात, तांदुळ होते सात  !
पण पहा कसा केला पातेली भर भात !

🎤**वाढले पिठले, वाढले पिठले !
पण खर सांगू तोंडाला ना पाणी सुटले !!          --------------------------------------------------------------------------------------
========================

🎤------प्रासंगिक गीते -----+-🎤

🎼**सण, समारंभ, ऋतू यांना अनुलक्षून म्हणावयाची ही गाणी असतात.तिळगुळाचे गाणे संक्रांतीला आणि नागोबाचे गाणे नागपंचमीला म्हटले म्हणजे प्रसंगोचित ठरते.🎹

  🔰----स्थानिक सण- जसे-----+🔰

***-भुलाबाई, गणपती, अक्षय तृतिया, दिवाळी, होळी या सणानुसार गीताचे गायन केले तर  मुलांना अनुभूती मिळते.ती त्यांना आवडते .
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🎤--------प्रासंगिक गीत-----------🎤

💠------संक्रांत सण------💠

🎹****आली आली संक्रांत आली ,
नंदू -चंदूची चंगळ झाली !!

***--मुगाची खिचडी लोणकढे तूप,
गुळाच्या पोळ्या खाल्ल्या खूप !!

*****-चुरचुरीत घावन,मसाला धिरडी, लोण्याचा गोळा,ताकाची कढी  !!

🍇*****शेंगा ,बोरे ऊस गंडेरी
उठता बसता तिळाची वडी  !!

****-हळदीकुंकवाला केळ्यांची लूट
केशर हलवा मूठ मूठ !!

♻*****गोड गोड चिक्कू , हिरवा हिरवा पेरु               तिळाच्या लाडवाने खिसा भरु  !!

********तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमचे तीळ सांडू नका,
आमच्याशी भांडू नका !! 😊
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        🍂 --दसरा---🍂
***आला दस-याचा सण करु या गंमत आपण !!
**आणू आंब्याची पाने लांब करु या तोरणे !!

***लावू घराला तोरणे ,बांधू घट्ट दोरीने  !!
घालू सडा रांगोळी,करु या लवकर आंघोळी !!

**खाऊ श्रीखंड पुरी,जाऊ सर्वांच्या घरी !!  **आणू आपट्याची पाने ,जाऊ सोने लुटणे  !!

**आला दस-याचा सण, नटू या आपण सगळे जण !!
**गंमत जंमत करण्याला, खूप आवडे आम्हाला  !!
-------------------------------------------------------------------------------------〰〰〰〰〰
========================
 🎭-----अभिनयगीत --------🎭

😎***मुलांच्या आवडीचा हा एक प्रकार. .नकला करण्याची वृत्ती मुलांमध्ये लहानपणापासूनच असते. मुले अनुकरणातून नकला करायला शिकतात. अभिनय गीतात मुलांच्या नक्कल करण्याच्या प्रवृत्तीचे समाधान होते.

🎹**गाण्यातल्या हा अभिनय करायचा असतो.म्हणून प्रथम या गाण्याचा अर्थ कळावा लागतो. त्याचप्रमाणे हालचालीवर ताबा ठेवून अभिनय करावा लागतो.

********म्हणजेच त्याच्या भाषेचा विकास झालेला असावा लागतो. शब्द, वाक्य, गाण्यातील योजना हे सर्व समजून त्याचा अर्थ लक्षात घेवून कृती करावयाची असते. म्हणून अभिनय गीताची भाषा सोपी हवी.स्वयंस्फूर्त अभिनय हाच खरा अभिनय असतो.🎼
========================

 🎭 -----अभिनय गीत- -------+🎭

***या रे या सार्यांनो या !
नकलाकारांच्या नकला पहा  !!धृ !!

👰****आल्या हो शेजारच्या आजीबाई !
*कंबर ताठ होतच नाही
*काठी टेकीत धापा टाकीत  !
*बसे मुलांना गोष्टी सांगत !!१!!

👳**आला हो गावचा पाटीलबुवा !
*जरीचा फेटा बांधलाय पहा
*दिसेना कान, आहे मोठा मान !
*लाल लाल चुटूक  जोडा छान !!२!!

📨***पत्र घ्या पत्र आहे कुणी दारात
*पेन्सिल कानावर, पिशवी खांद्यावर !
*राम राम मंडळी निघालो गावभर  !!३!!

👮**आला हो देशाचा शूरशिपाई !
***चालण्याची ऐटच भारी
**एक डोळा मिटून नीट नेम धरुन  !
**दाखवितो हा बंदुक मारुन  !!४!!🎼

------------------------------------------
========================

🎭-----अभिनय गीत------------ 🎭
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🐸टुणटुण टुणटुण बेडूकताई !
डराव डराव बोलत राही
आपण उड्या मारु या
बेडूकताई होऊ या !!१!!

🐰लुसूलुसू लुसूलुसू ससेभाऊ !
कोवळा पाला हाती घेऊ
हिरव्या कुरणी धावू या !
सस्सेभाऊ होऊ या !!२!!

🐘हळूहळू हळूहळू हत्ती  डोले!
लांब सोंड मजेत हाले
डोलत डोलत चालू या !
हत्ती दादा होऊ या !!३!!

🦄टपटप टपटप आवाज येई!
घोडेदादा धावत येई
त्याच्या संगे धावू या !
घोडेदादा होऊ या   !!४!!

🐬सुरुसुरु सुरुसुरु मासळी होऊ !
पाण्यामध्ये लपूनी राहू
तिच्या संगे पोहू या !
मासळी ताई होऊ या  !!५!!

--------------------------------------------------------------------------------------   ****एकगीत***                             〰****हे गीत पद्यात व गद्यात ह्या पध्दतीने म्हणावयाचेआहे.****                      〰***भक् भक् भक् भक् गाडी आली 〰〰〰〰〰〰                      ***स्टेशनवरतीगर्दीझाली                      ***पुरी,कचोरी, शेव, चिवडा, गरम चहा        - ***ठंडा ठंडा पानी ,                            ****टण् टण् टण्   घंटा झाली -गाडी आली            ******************स्टेशनआले -गाडीथांबली                  **उतरा उतरा उतरा -चढा चढा चढा          **या या या बसा बसा बसा             *सामानाचीधामधुम              हमालझाले घामाघुम                आतचाले घुसाघुशी                 बाहेरचाले पुसापुशी                टणटणटण घंटाझाली                 लालनिशान हिरवेझाले              झुक झुक झुक गाडी चाले            गाडी आली गाडी गेली              तुमची आमची मौज झाली             ------- -------------------------------------------------------------------------------------- शब्दांकन/संकलन🔮
✒सौ.जया नेरे(पाटील)-नवापूर - नंदुरबार
-       ध्यास आमुचा गुणवत्ता
📝



🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤 〰〰〰〰〰〰〰〰

             



🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤

जिल्हा शिक्षण परिषद-माझे सादरीकरण

💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠
*मा.आदरणिय,नंदकुमार साहेब यांच्या नियोजनाने,व प्रेरणेने सुरु झालेले,*

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यप्रेरणा शिक्षण परिषद,आज नंदुरबार येथे घेण्यात आली*

*कार्यप्रेरणा शिक्षण परिषादेसाठी उपस्थित मार्गदर्शक*

*मा.श्री.प्रविण कळम पाटील साहेब*,
*शि.वि.अ-देवराई,जि.बीड*

*मा.संदिप पवार सर,मुख्याध्यापक-जिरेवाडी जि.बीड*

*आदरणिय-ललिता भामरे mam केंद्रप्रमुख-केंद्र-पिंपळोद-नंदुरबार*

मा.प्रविण काळम पाटील साहेबांनी मुल समजून घेतांना यावरील ppt व व्हिडीओ क्लिप द्वारे खूपच उत्कृष्ट व प्रेरक मार्गदर्शन केले,

तसेच मा.संदिप पवार सरांनी जरेवाडी शाळेचा १९९५ पासून ISOपर्यंतचा प्रवास केलेली प्रगती ,
मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम-
यांचे ppt द्वारे उत्तम मार्गदर्शन करुन सर्वांना प्रेरणा दिली,

*त्याच टिममध्ये असणाऱ्या मा.केंद्रप्रमुख-ललिता ताई भामरे mam*-नंदुरबार
यांनी त्यांच्या केंद्रात प्रगत शाळांच्या दृष्टीने केलेल्या कामाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या शिक्षणपरिषदेत जिल्ह्यातून एक BEO-
एक शि.वि..अ,एक केंद्रप्रमुख व एक शिक्षक
यांचे प्रगतच्या दृष्टीने सादरीकरण होते,

मा.श्री.एस.एन.पाटील साहेब-गटशिक्षणाधिकारी -अक्कलकुवा

मा.श्री.साळवे साहेब-शि.वि.अ-शहादा

मा.श्री.अनिल वानखेडे सर-केंद्रप्रमुख-चिंचपाडा-नवापूर
यांनी आपापल्या पदानुसार आजपर्यंत प्रगत महाराष्ट्र या दृष्टीने केलेल्या कामांविषयी ppt द्वारे सादरीकरण केले.

मा.श्रीम-बोरसे mam,
अधिव्याख्याता -डाएट-नंदुरबार यांनी प्रगत महाराष्ट्र च्या दृष्टीने विविध मार्गदर्शक  मुद्दे मांडलेत.

नियोजनात अचानक झालेला बदल-
*मा.ललिता ताई भामरे यांच्या सौजन्याने*,

*त्यात अचानक मला सादरीकरणासाठी सांगण्यात आले,*

*ppt त फोटोंचे संकलन सुरु असल्याने ते मला सादरीकरणासाठी कामास आले,*
*मला हा अनुभव खूप छान वाटला,*

*खूप कमी वेळ देण्यात आल्यामुळे सुरवातीपासून घेतलेल्या उपक्रमांविषयी विस्तृत सांगता आले नाही,मुल समजून घेतांनाचे अनुभव शेअर करतांना व्हिडिओ द्वारे एक अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला,*

*मा.डॉ .सी.के.पाटील साहेब यांची प्रेरणा व मा.केंद्रप्रमुख- यांचे मार्गदर्शनाने मिळालेले प्रोत्साहन*

*प्रगत महाराष्ट्र कार्यप्रेरणा शिक्षण परिषदे जाण्याची संधी आदरणिय केंद्रप्रमुख- पाटील सर यांनी दिली त्यांचे मनस्वी आभार*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*✍🏻 शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠

जिल्हा शिक्षण परिषद-माझे सादरीकरण

💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠
*मा.आदरणिय,नंदकुमार साहेब यांच्या नियोजनाने,व प्रेरणेने सुरु झालेले,*

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यप्रेरणा शिक्षण परिषद,आज नंदुरबार येथे घेण्यात आली*

*कार्यप्रेरणा शिक्षण परिषादेसाठी उपस्थित मार्गदर्शक*

*मा.श्री.प्रविण कळम पाटील साहेब*,
*शि.वि.अ-देवराई,जि.बीड*

*मा.संदिप पवार सर,मुख्याध्यापक-जिरेवाडी जि.बीड*

*आदरणिय-ललिता भामरे mam केंद्रप्रमुख-केंद्र-पिंपळोद-नंदुरबार*

मा.प्रविण काळम पाटील साहेबांनी मुल समजून घेतांना यावरील ppt व व्हिडीओ क्लिप द्वारे खूपच उत्कृष्ट व प्रेरक मार्गदर्शन केले,

तसेच मा.संदिप पवार सरांनी जरेवाडी शाळेचा १९९५ पासून ISOपर्यंतचा प्रवास केलेली प्रगती ,
मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम-
यांचे ppt द्वारे उत्तम मार्गदर्शन करुन सर्वांना प्रेरणा दिली,

*त्याच टिममध्ये असणाऱ्या मा.केंद्रप्रमुख-ललिता ताई भामरे mam*-नंदुरबार
यांनी त्यांच्या केंद्रात प्रगत शाळांच्या दृष्टीने केलेल्या कामाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या शिक्षणपरिषदेत जिल्ह्यातून एक BEO-
एक शि.वि..अ,एक केंद्रप्रमुख व एक शिक्षक
यांचे प्रगतच्या दृष्टीने सादरीकरण होते,

मा.श्री.एस.एन.पाटील साहेब-गटशिक्षणाधिकारी -अक्कलकुवा

मा.श्री.साळवे साहेब-शि.वि.अ-शहादा

मा.श्री.अनिल वानखेडे सर-केंद्रप्रमुख-चिंचपाडा-नवापूर
यांनी आपापल्या पदानुसार आजपर्यंत प्रगत महाराष्ट्र या दृष्टीने केलेल्या कामांविषयी ppt द्वारे सादरीकरण केले.

मा.श्रीम-बोरसे mam,
अधिव्याख्याता -डाएट-नंदुरबार यांनी प्रगत महाराष्ट्र च्या दृष्टीने विविध मार्गदर्शक  मुद्दे मांडलेत.

नियोजनात अचानक झालेला बदल-
*मा.ललिता ताई भामरे यांच्या सौजन्याने*,

*त्यात अचानक मला सादरीकरणासाठी सांगण्यात आले,*

*ppt त फोटोंचे संकलन सुरु असल्याने ते मला सादरीकरणासाठी कामास आले,*
*मला हा अनुभव खूप छान वाटला,*

*खूप कमी वेळ देण्यात आल्यामुळे सुरवातीपासून घेतलेल्या उपक्रमांविषयी विस्तृत सांगता आले नाही,मुल समजून घेतांनाचे अनुभव शेअर करतांना व्हिडिओ द्वारे एक अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला,*

*मा.डॉ .सी.के.पाटील साहेब यांची प्रेरणा व मा.केंद्रप्रमुख- यांचे मार्गदर्शनाने मिळालेले प्रोत्साहन*

*प्रगत महाराष्ट्र कार्यप्रेरणा शिक्षण परिषदे जाण्याची संधी आदरणिय केंद्रप्रमुख- पाटील सर यांनी दिली त्यांचे मनस्वी आभार*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*✍🏻 शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠

केंद्रस्तरीय शिक्षणपरिषद-केंद्र-भालेर----स्थळ--जि.प.केंद्रशाळा,भालेर,ता.जि.नंदुरबार

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*मा.आदरणिय डॉ.सी.के.पाटील साहेब,गटशिक्षणाधिकारी,पं.स.नंदुरबार*
यांच्या सुनियोजनाने ,
*आदरणिय श्री.आबासो,श्री.वसंत पाटील सर*
यांच्या मार्गदर्शनाने,

*केंद्रस्तरीय शिक्षणपरिषदेचे आयोजन*
*दि-५/१०/२०१६*

*केंद्र-भालेर ,ता.जि.नंदुरबार*

*स्थळ-जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार*

केंद्रीय शिक्षण परिषदेत ,
*मा.आदरणिय केंद्रप्रमुख-*आबासो,श्री.वसंत पाटील सर,
यांनी ज्ञानरचनावादी पध्दती व भेटी दिलेल्या शाळेतील सद्यस्थिती याबाबत मार्गदर्शन केले,

प्रगत वर्ग/ शाळा या दृष्टीने योग्य दिशेने जाण्याविषयी मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली,
सर्व शिक्षकांचा प्रतिसाद चांगला होता.

यजमान शाळेतील इ.४थीच्या मुलांनी बालसभा कशी घ्यावी या विषयी सादरीकरण करुन दाखवले,

जि.प.केंद्रशाळा ,भालेर येथिल
*मुख्याध्यापक-सौ.जया नेरे ,*
यांनी तीन वर्षापूर्वीची शाळा व आजची स्थिती पर्यंतचा प्रवास ppt द्वारे सादर केला,

प्रगत वर्ग /शाळा दृष्टीने वाटचाल करतांना करत असलेले प्रयत्न ,

घेत असलेले उपक्रम,
मिळणारा प्रतिसाद,

बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे मुल नेतांना कोणत्या उपक्रमाचा,

साधनाचा सकारात्मक परिणाम दिसतोय,

या विषयी मुद्दे मांडले,

डिजीटल इंटरअँक्टिव्ह साठी मिळवलेला लोकसहभाग या विषयी ही,

विविध उपक्रमांचे ppt द्वारे सादरी करण केले,

*जि.प.शाळा,होळ तर्फे रनाळा,*
*शाळेचे मुख्याध्यापक-श्री.ठाकरे सर,*
यांनीही ppt द्वारे शाळेची प्रगती,
डिजीटल शाळेसाठी झालेले प्रयत्न या बाबत सादरीकरण केले.

*शिक्षण परिषदेस मा.आदरणिय श्री.डॉ .सी.के.पाटील साहेब,*
गटशिक्षणाधिकारी,पं.स.नंदुरबार ,

यांनी भेट देवून प्रगत शाळेविषयी उपस्थित शिक्षकांना प्रेरक मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या सकारात्मक कामांचा विशेष उल्लेख करुन प्रोत्साहन दिले.

केंद्रातील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्वक यशोगाथा कार्डपेपर वर लिहून आणली,

ती यशोगाथा सर्वांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

त्यावर प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

एक छोटासा खेळ घेवून शिक्षणपरिषदेची सांगता करण्यात आली.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*चला चला होऊ या गोळा,*
*भरवू या शिक्षण मेळा,*

*इतका लावा बाळाला लळा,*
*की बोलू लागेल शाळेची शिळा न् शिळा ||*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

माझी चारोळी माझी रचना

सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार

माझी चारोळी माझी रचना
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभसकाळ*🌹
*-----------------------------*
*🌷एकच ध्यास गुणवत्ता विकास*||

*ज्ञानरचनावादाने* केली धमाल,
*तंत्रज्ञानानेही* केली खूपच कमाल ||

मुले लागली सगळी *बोलू* आणि *लिहू* ,
लागली ती *खुलू* आणि *फुलू* ||

दृष्टी मिळाली निरीक्षणाने,
प्रश्न विचारती भन्नाट गतीने ||

*ज्ञानरचनावाद*,की *तंत्रशिक्षण,कि असो ABL*,||

मार्ग सारे जाती हे एकाच दिशेने,
*प्रगत महाराष्ट्रासाठी  गुणवत्ता विकासाने* ||

 *मान्यवरांनी* ही धरली कास,
*गुरुजनांनी* ही केला उत्तम प्रयास ||

*भाषा ,गणित* असो की *इंग्रजी* ,
सर्वांचा आहे एकच ध्यास ||

*गुणवत्ता विकास*
*गुणवत्ता विकास* ||||
*-----------------------------*
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*----------------------------*
🔹🔸🔹🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभ श्रावण सकाळ*🌹
*----------------------------*
*सण,सोहळ्यांचा घेऊनी मेला,*
*आला आला श्रावण आला ||*

*सद् भावना अन् नाती जपण्या,*
*व्रत वैकल्याचा घेऊन रेला ||*
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार


----------------------------
गर्भात माझेच दिले बलिदान,
तरी मीच वाढविला विश्वात मान ||

*----------------------------

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*अस सासर सुरेखबाई,*
*शौचालय जे बांधून घेई*||
*----------------------------*
*स्वच्छ महाराष्ट्राचे एकच निशाण*,
*शौचालयाचा वापर हेच अभियान*||
*----------------------------*
सौ जया नेरे  पाटील
*----------------------------
*आहे  सुखी जरी दिल्या घरी,*

*तरी  माहेरच्या साडीची ओढ असे न्यारी*
*-----------------------------
*बहिण असेल किती ही श्रीमंत,*

*पण माहेरच्या साडीशिवाय ,*

*बोळवण होत नाही शेवट पर्यंत* !!
----------------------------- ------------
माझ्या सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

 🙏🏻माझ्या सर्व बंधूना परमेश्वरा उदंड आयुष्य दे !!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🌤☄🌤☄🌤☄🌤☄🌤
*----------------------------*
*हाताची पाचही बोटे नसतात सारखी,*

*पण एकमेकांशिवाय होतात ती पारखी ||*

*यातून हाच बोध तर घ्यायचाय आपणांस ,*

*एकजुटीने कार्य करु या नसलो जरी सारखी ||*
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
?
*🌹शुभसकाळ*🌹
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*ज्ञानसागरात मुक्त पोहुनी,*
*ज्ञानमोती चला वेचू या* ||

*ज्ञानज्योती ही तेवत ठेवूनी,*
*शिक्षणनगरी सारी उजळवू या*||
*~~~~~~~~~~~~~~~~~~~*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*🌹शुभसकाळ*🌹
*-----------------------------*

*ज्ञानामृत हे करुनी प्राशन*
*अमर होवू या सारे आपण*||

*ज्ञानदानाचे कार्य करु या,*
*सफल होईल सारे जीवन*||
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
🌹
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभसकाळ*🌹
*-----------------------------*
*विद्यार्थी म्हणती गुरुजनांना*,
*तुम्हीच आमचे विठ्ठल-रुखमाई*||

*शाळाच आमची पंढरी अन्,*
*आम्ही आहो तुमचे  वारकरी*||
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभसकाळ*🌹
*----------------------------*
*शाळा हे मंदिर आपुले,*
*विद्यार्थी हेच दैवत*||

*ज्ञान देवूनी करु या पूजन*,
*स्थान मिळवू या पुण्यलोकात*||
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*-----------------------------*
??🔹🔸?🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभसकाळ*🌹
*----------------------------*
*सोहळा असे हा स्वातंत्र्याचा,*
*शूरवीरांच्या बलिदानाचा ||*

*स्मरणगीते गाण्याचा,*
*वंदन तयांना करण्याचा||*
*----------------------------*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*-----------------------------*
🔹🔸🔹🔸
*🌹शुभसकाळ*🌹
*-----------------------------*
       *🌷मैत्री*🌷

मैत्रीत असावी शुद्ध पवित्रता,
ना असावी कधी कटुता,
मैत्री हे नाते असे जीवांचे,
भेद नसे लहान थोर यांचे ||

वडील असो की आई कुणी,
कि असो बंधु -भगिनी,
नाते असू दे पती-पत्नीचे,
मैत्री नाते सुखी जीवनाचे ||

अमर झाली मैत्री जयांची,
कृष्ण-सुदामा नाम तयांची,
सुखात देती साथ सारे,
दुःखात असती ते मित्र खरे||
*------------------------------*
*मैत्री दिनाच्या आपणास*
*मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ||*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*----------------------------*
*शब्दांकन/शुभेच्छुक*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*----------------------------*
🔸🔹🔸🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻
*🌹शुभसकाळ*🌹
*----------------------------*
*वसुंधरा बघा कशी ही नटली,*
*हिरवा शालू नेसूनी खास  ||*

*फळ,फुलांचा लेवूनी साज,*
*श्रावणाच्या शुभेच्छा देण्या आपणास ||*
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*---------------------------????🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*🌹शुभसकाळ*🌹
*----------------------------*
*छोडो भारत, हा देऊनी नारा*
*गेले फासावर अन् दिले बलिदान||*

*एकलव्यास त्या करु प्रणाम*
*गुरुदक्षिणा दिली करुनी अंगठा दान ||*
*----------------------------*
९ अॉगस्ट
*क्रांती दिन* व
*जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*🌹शुभ श्रावण सकाळ*🌹
*----------------------------*
पानाफुलांनी सजली *देवालये,*
तशीच मुलांनी सजली *विद्यालये ||*

देवालयात घंटेचा *किणकिणाट,*
विद्यालयात मुलांचा *किलबिलाट ||*

*आरतीचा* सूर देवालयात ऐकतो,
*प्रार्थनेचा*सूर विद्यालयात निघतो ||

दोन्ही भक्तांची *एकच वाट,*
एक  *कुटुंबासाठी* तर
 एक *शाळेसाठी*
मांडतो *पाट* ||
*-----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार      ?
*🌹शुभ श्रावण सकाळ*🌹
*----------------------------*
*रवीकिरणांनी दिशा उजळती,*
*फुल,झाडे ही बघा मोहरती ||*

*ज्ञान रवी ही गुरुजन असती,*
*ज्ञानकिरणांनी मुले ही फुलती ||*
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार

 ☄☄🌤☄🌤☄🌤☄🌤☄
*🌹 शुभ श्रावण सकाळ*🌹
    *🌷कृष्णजन्माष्टमी*🌷
*---------------------------*
*दृष्ट प्रवृत्तींचा करण्या संहार,*
*जन्म घेतला गोकुळात ||*

*वाईट वृत्तींचा करण्या नाश,*
*पुन्हा जन्मावा तू कलियुगात ||*

*गीतेतून केलास उपदेश छान,*
*जीवन जगण्याचा दिला मंत्र महान ||*
*----------------------------*
*कर्मण्येवाधिकारस्ते  मा फलेषु कदाचन |*
*मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सड्रोsस्त्वकर्मणी || ४७||*
*---------------------------*
तुला कर्म करण्याचा अधिकार आहे.त्याच्या फळाविषयी कधीही नाही.म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस.तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरु नकोस.
*----------------------------*

*कृष्ण जन्माष्टमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄🌤☄🌤☄🌤☄🌤☄

☄🌤☄🌤☄🌤☄🌤☄
*🌹शुभ श्रावण सकाळ*🌹
*---------------------------*
*अडचणींचा डोंगर असेल जरी,*
*तरी करु या मात चढून वरी ||*

*प्रोत्साहनाने देऊ एकमेका उभारी,*
*ध्येय असू द्या सदैव आपुल्या उरी ||*
*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🌤☄🌤☄-------------------------*
धवळ्या पवळ्याचा पहा रुबाब आज,
दिमाखात चालती लेवूनी साज ||

वरिसभर करितो धन्याची चाकरी,
तेव्हाच मिळते सर्वांना भाकरी ||
*-----------------------------*
*बैलपोळा सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!*
*----------------------------*
*✍??शुभेच्छुक*-
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🌤☄🌤☄🌤

Saturday, 8 October 2016

माझी शाळा माझे उपक्रम-दप्तराविना शाळा-कागदकाम-मातीकाम-

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार*

*दि-८/१०/२०१६*
*वार-शनिवार*

*दप्तराचे ओझे कमी करणे अंतर्गत-*

*दप्तराविना शाळा नियोजन-*
*-----------------------------*
आज जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार येथे दप्तराचे ओझे कमी करणे  अंतर्गत ,

दप्तराविना शाळा,नियोजन करुन
 *कार्यानुभव विषय घेण्यात आला.*

यात इ.४थी वर्गात घोटीव कागदापासून फुले तयार करुन कागदावर त्यांची सजावट करणे.

इ.४थी वर्गशिक्षक-
*श्री.पंकज वानखेडे सर,*
यांनी घोटीव कागदापासून फुले कशी तयार करावीत व ती रंगसंगतीनुसार दुसऱ्या कागदावर चिकटवून कशी सजावट करावी,या बाबत प्रात्यक्षिक करुन दाखवले,
त्या सोबतच मुलांकडून प्रात्यक्षिक  करवून घेतले.

इ.३री-वर्गशिक्षक-
*श्री.रामराज गायकवाड सर*
यांनी
 *येणाऱ्या दिवाळी सणाचे औचित्य ठेवून*

 मातीच्या चिखलापासून पणती कशी बनवावी या विषयी प्रात्यक्षिक करुन दाखवले व मुलांकडून करुन घेतले.

*इ.१ली/दुसरी*-
*वर्गशिक्षक-सौ.जया नेरे,*
यांनी विद्यार्थ्यांकडून गोष्टीवर आधारीत नाटीका सादर करुन घेतली,
योग्य ठिकाणी मार्गदर्शन करुन सराव करुन घेतला,
सर्व मुलांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला.

*विद्यार्थ्यांना त्यांनी सादर केलेल्या नाटिकेचा व्हिडीओ करुन लगेच दाखवण्यात आले,व्हिडीओ पाहतांना त्यांना खूप आनंद होत होता,व स्वतःलाच पाहून मुले लाजत होती,*

*त्यांच्या झालेल्या चुकाही त्यांच्या लक्षात येत होत्या,त्याविषयी एकमेकांशी ती चर्चा करत होती.*
*-----------------------------*
*अशीच दप्तराविना शाळा आठवड्यातून एकदा असावी असे मुलांनी बोलून दाखवले.*
*----------------------------*
*नियोजन व सहभाग-*

*सौ.जया नेरे-मुख्याध्यापक*
*सहशिक्षक-*
*श्री.रामराज गायकवाड सर*
*श्री.पंकज वानखेडे सर*
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार

*-----------------------------*
*✍🏻 शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

Monday, 3 October 2016

लहान मुलांसाठी छोटे विनोद-चला याकडेही लक्ष देऊ या.

🔹🏅🔸🏅🔹🏅🔸🏅
🔹
🇯 🇦🇾🇦
        🇳  🇪 🇷 🇪

*चला या कडेही लक्ष देऊ या.*
*विषय-*भाषा
*इ.२री-*
*पाठ-३२*

*वाचा आणि हसा*
*आई* :अरे गणू,बबडी का रडते आहे रे ?

*गणू* :अगं आई,मी तिथेच आहे,तिला काहीही झालं नाही.

*आई* :अरे,मग ती का रडते आहे ,जरा बघ.

*गणू* :अगं आई,तू तिला चिक्की दिली होतीस ना,
ती कशु खायची,हे मी तिला दाखवत होतो.

😀😀😀😀😀😀😀😀😀
*-----------------------------*
*पाठ-३६*

*वाचा आणि थोडं हसा*

*आई* :चिनू,डब्यात मी काल दोन लाडू ठेवले होते.
आता एकच शिल्लक कसा ?

*चिनू* :अगं,अंधारात दुसरा लाडू सापडलाच नाही.

😀😀😀😀😀😀😀😀😀
*-----------------------------*
*चला विनोद समजून घेऊ या.*
*चला विनोद सांगू या.*

*थोडं ताणमुक्त होऊ या.*

*थोडं मोकळपणाने हसू या.*
*----------------------------*
*असे छोटे छोटे विनोद तयार करुन मुलांना ऐकवू या.*
*----------------------------*
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸