Sunday, 16 October 2016

असा ही एक अनुभव-२०११

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*असा ही एक अनुभव*
*---------------------------------*
*साल होते २०११*-
त्या शाळेवर मी बदली होऊन गेले. मला तिसरीचा वर्ग देण्यात आला.तो वर्ग ज्यांचा होता त्यांनी म्हणे यांना शिकवलेच नाही असे इतर शिक्षक मला सांगू लागली.
madam तुम्ही हा वर्ग का घेतला,
पण आहे तेथून पुढे जाऊ असा विचार करुन अध्यापनास सुरुवात केली.
त्या वर्गातील काही मुलं आठ दिवस झाली तरी वर्गात आली नाही.मी मुख्याध्यापकांना विचारले तर ती मुले भिल्ल वस्तीत राहतात,शाळेत येत नाही,

*गृहभेटी*
मी दुसऱ्या मुलांना घेऊन त्यांच्या घरी गेले.त्यांच्याचङ भाषेत पालकांना समजावले.
काही मुलं अर्धा कि.मी.अंतरावर रहात होती,तेथेही
 गेलो,रस्त्याने पावसात भिजतङङ मुलही सोबत आली.

*मुल शाळेत आलीत*
पण वर्गात येत नव्हती.पटांगणातच रहात,खेळत.
मी पटांगणात त्यांच्या जवळ जायचे,गप्पा करायचे.शै.साहित्य दिले.त्यांना मी जवळची वाटू लागले.

*हळूहळू मुलं ओट्यावर आली*
मी ओट्यावर त्यांच्या साठी मुळाक्षर,अंक अॉईलपेंटने लिहिलीत.भितीवर फळा रंग लावून फळे केलेत.त्यांना लिहिण्यासाठी.रंगकामात मन रमेल म्हणून रंग-स्केचपेन-कागदं पुरवलीत.

*वाचनाकडे*
ओट्यावरील मूळाक्षरांवर खेळातून अक्षर वाचन घेऊ लागली.
सोपे शब्द वाचन घेऊ लागली.
पण त्यांच्या लक्षात राही ना.

*स्वतःचे नाव*
त्यांना स्वतःचे नाव लिहिण्यास शिकवले,मुल मोठी होती म्हणून लेखन लवकर ,ठसठशीत करु लागली.

*वाचनासाठी स्वतःच्या नावाचा वापर*
मला असे वाटत होते कीङ काही चित्र, शब्द यांना अपरिचित वाटतात,म्हणून अक्षर लक्षात रहात नाही,
मी या साठी त्यांच्या नावाचा वापर केला.

*एकीचे नाव*- राजबाई
यातील एक एक अक्षर घेतले.
शिला
सिमा
नाना
दिपक
या प्रकारे मी त्यांना अक्षर ओळख देऊ लागले.
यातून लवकर वाचन त्यांनी अवगत केले.
आधी ५ मुली होत्या.
त्यांच्या मैत्रीणी दुसऱ्या शाळेत होत्या त्या ही ४मुली
माझ्या या प्रयत्नामुळे माझ्या शाळेत आल्यात.
पुढल्या वर्षी वयानुरुपला एक मुलगी त्यांचीच मैत्रिण आली .तिला ही अशाच पध्दतीने अक्षर ओळख करुन दिली.एका वर्षात ही हि मुलगी छान वाचायला लिहायला लागली.
अशा एकूण ९मुलींना मी शाळेच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी झाले.
काही दिवस यांना रोज एकङ चॉकलेट व एक रुपया असे ही वाटप केले.नेहमी लेखन साहित्य पुरवले.
नंतर ह्या मुला मुलींना वर्गात फक्त त्यांचीच जागा म्हणून स्पेशल जागा ठेवली.
*---------------------------------*
*या अनुभवातून*-
मूळाक्षरे लक्षात राहण्याची एक पध्दत मला अवगत झाली.
*--------------------------------*
आज ही वस्तीत गेल्यावर ऐकायला मिळते ताई तुझ्या मुळे आमची मुलं शिकली,शिकत आहेत.

*त्या वेळी अभिमानाने ऊर भरुन आल्याशिवाय रहात नाही*
*----------------------------------*
*अनुभव कथन/शब्दांकन*

सौ.जया नेरे (पाटील)
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

अक्षर फुग्याला नेम लावणे.

🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲

*🎭माझी शाळा माझे उपक्रम*

*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*

*📔आनंददायी शिक्षण*

*🔮उपक्रमाचे नाव*-

*🎈अक्षर फुग्याला नेम लावणे*.

*📍संकल्पना*-

🔸मुळाक्षरे-मराठी-इंग्रजी
🔸अंक-संख्या-मराठी-इंग्रजी
🔸शब्द-मराठी-इंग्रजी
🔸जोडाक्षर युक्त शब्द
🔸यांचा वाचन सराव या खेळाद्वारे होत असतो.
🔸सर्व विद्यार्थी या खेळात खूप उत्साहाने सहभागी होतात.

*🎈साहित्य*-
🔸फळ्याला धरुन ठेवेल अशी गोळी असलेली बंदुक,रंगीत खडू

*🎈कृती*-
🔸फळ्यावर विविध रंगांचे फुगे काढायचे,
🔸व त्यात विविध घटक लिहायचे  -एका वेळी एकच

*🎈जसे*-
🔸मराठी मुळाक्षर,
🔸इंग्रजी मुळाक्षर,
🔸वरील प्रमाणे गरजे नुसार एक एक घटकांच्या दृढीकरणासाठी हा खेळ योग्य वेळी खेळून घेऊ शकतो.

🔸जो विद्यार्थी वाचायचा कंटाळा करत असतो तो देखिल उत्साहाने वाचण्याचा प्रयत्न करतो.

*🎈चला तर अक्षर फुग्याला नेम लावू या* ||
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`~
*✍🏻शब्दांकन*✍🏻
*🙏🏻सौ.जया नेरे (पाटील)*
*नंदुरबार*
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲🏡🌲

मासा गळाला लावणे.

🎀खेळातून शिक्षण🎀      
  -----------------------------                                         🔰चला खेळूया,शिकूया शाळा!                                   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~                     🎈मनोरंजक खेळ-🎈  
               
🐟मासा गळाला लावणे🐟 -    

 🐬फिश-कार्डशीटचे लहान मोठे आकाराचे मासे तयार करणे -  
                       
🐳माशांच्या तोंडाला स्टँप्लर पिन मारणे.  
         
 🚣🏿पाँड--टोपली --तिला चमकी कागदाने सजवून तलाव तयार करणे.  
                 
🎣गळ--एक काडी ,काठी(लहान) घेणे,तिला लेस (दोरा)बांधणे,    
                         
🎏लेस ला शेवटी लोहचुंबकाचा तुकडा बांधणे.                                         तयार केलेल्या माश्यांवर  विविध बाबी लिहू शकतो.  
                           
📕मराठी-📕  
                                 
 १)अ ते ज्ञ अक्षर  
                       
 २)साधे शब्द    
                           
 ३)स्वरचिन्हयुक्त शब्द  
               
 ४)जोडाक्षर युक्त शब्द    
               
📗इंग्रज📗 --  
                       
  १)A to Z letters  
           
 २)spellings    
                         
 📙गणित📙  
                                   
  १)अंक   २)गणिती क्रिया    
                         
 📝ह्या विविध बाबी माशांवर लिहिणे.  
             
 ⚜कृती---पाँडमध्ये (तलाव)मासे टाकणे, व गळाच्या साह्याने मासा गळाला लावणे.  
                                   
  ⚜यात लहान मासे किती?  
           
 ⚜मोठे मासे किती?    
                           
⚜ किती मासे गळाला लावले  
                 
 💠ह्या गणिती संकल्पनांची ओळख सुरवातीला देवू शकतो.      
       
♦गळाला लागलेल्या माशावर काय लिहिलय,ते मुलं वाचतात,म्हणून मुलांचे वाचन होते,सराव होतो.    
                             
  🏆ह्या खेळातून मुलांना  आनंद मिळतो.
                           
  🎯सुट्टीतील छंदवर्ग शिबीरात आपण हा खेळ खेळवून शिकण्याचा वेगळा आनंद देवूया.  
                               
🎣चला तर मग मासा गळाला लावू या.
           
✍�शब्दांकन✍�      
                           
 🎀सौ.जया नेरे(पाटील)--नंदुरबार🎀             -------------------------

असा केला अभ्यास -इ.२ री-गणित

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

*🔹माझी शाळा माझे उपक्रम*
*🔸ध्यास आमुचा गुणवत्ता*

*📕असा केला अभ्यास*-
*🔸इयत्ता* -दुसरी
*🔹विषय*-गणित

*🔸विविध प्रकारे संख्या समजणे*.

*🔹संख्येचे दृढीकरण*-

*🔸साहित्य*-
दशक गठ्ठा,सुट्या काड्या,संख्या कार्ड,
मण्यांची माळ

*🔅कृती🔅*-

♦एक- एक विद्यार्थ्याला बोलवले,
त्याला कोणतीही एक संख्या सांगितली ,
ती संख्या विद्यार्थ्यांने,
🔸दशक गठ्ठा व सुट्या काड्या(प्रतिके)
वापरुन दाखवली.

 🔹सांगितलेल्या संख्येचे संख्याकार्ड शोधून दाखवले,

🔸कार्डावरील संख्येचे दशक-एकक रुपात वाचन केले,

🔹संख्येतील दशकाची किंमत सांगितली,

🔸ती संख्या मण्यांच्या माळेवर देखिल दाखवली.

🔹अशा प्रकारे एक संख्या अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना दाखवता आली तर संख्येचे दृढीकरण होण्यास मदत होते.
संख्या मनात पक्की ठसते.

🔸ह्या पध्दतीने रोज विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातोय.
*--------------------------------*
विद्यार्थ्यांना खूप मजा वाटली,अभ्यासाचा ताण जाणवला नाही.पुन्हा-पुन्हा असा अभ्यास करण्याची मागणी करु लागले.
*-----------------------------------*

*✍🏻शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार

📚🏡📚🏡📚🏡📚🏡📚🏡

बादलीत चेंडू टाकणे.

🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
*🔮माझी शाळा माझे उपक्रम*
*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*

*⛹आनंददायी शिक्षण*-

*🕹मनोरंजनातून शिक्षण*

*🎾उपक्रमाचे नाव*-बादलीत चेंडू टाकणे.

*🗑🎾साहित्य* -बादली,चेंडू

*📍कृती*-एका-एका  विद्यार्थ्यांला सुरुवातीला १० चेंडूचे उदिष्ट द्यायचे.

*निष्पत्ती*-
१)गणन

२)चेंडू किती टाकले ?

३)बादलीत किती चेंडू पडले ?

५)बादलीच्या बाहेर किती चेंडू पडले ?

६)बादलीत , बादली बाहेर

कितीने कमी कितीने जास्त ?

७)पेक्षा कमी ,पेक्षा जास्त.

८)मिळविणे-कमी करणे

🔸ह्या गणिती संकल्पना या खेळातून सहज शक्य होतात .
मुलांना खेळता खेळता कळत-नकळत ज्ञान मिळते.

*चला तर* --खेळता खेळता शिकूया  ...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*✍🏻शब्दांकन*✍🏻-
*🙏🏻सौ.जया नेरे (पाटील)*

*जि.प.केंद्र शाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*

🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
*पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*!!
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

माझे काव्य माझी रचना----मी

*मी*
मीच मला कळले नाही,
मी न जाणिल्या भावना ही,
अट्टाहास केला मी जगण्याचा,
परि मला तू जगविलेच नाही ||

केलास अपमान ह्या जन्माचा,
मानले ना तू मला कधी ही,
धाकात राहिले,कष्टात जगले,
बदल कसा तो घडलाच नाही ||

विविध रुपाने सामोरी आले,
विविध रुपात तू ही धाकविले,
कधी न जाणिले मला तरी ,
मी तुझ्या च साठी जीवन जगले. ||

न माझा श्वास मोकळा,
न कधी मी जगले मोकळी,
नित्य सतावतो सवाल मजला,
अस्तित्व माझे ,मलाच न कळी ||

मला नको तू मानूस देवता,
नको मला तू बनवू दासी,
माणूस आहे,माणूस असू दे,
जगू दे,फुलू दे,बहरु दे आता तरी ||
*------------------------------*
*✍🏻शब्दरचना*

*सौ.जया नेरे(पाटील)*
नंदुरबार

Saturday, 15 October 2016

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आनंदोत्सव--१५/१०/२०१६

✨☄✨☄✨☄✨☄✨
🇯 🇦🇾🇦
        🇳  🇪 🇷 🇪
*----------------------------*
*माझी शाळा माझे उपक्रम*

*जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार*
*---------------------------*

 *कोजागिरी पौर्णिमे निमित्त*
*आनंदोत्सवाचे*
आयोजन करण्यात आले.

*दि-१४/१०/२०१६*
रोजी *आनंद बाजाराचे* नियोजन करण्यात आले.
त्यात मुलांनी सर्व *नाश्त्याच्या खाद्यपदार्थांचे दुकान* थाटली होती,
प्रत्येक जण आपल्या दुकानाची जाहिरात करत होते.व आपल्या दुकानाकडे घेणाऱ्यांचे लक्ष  वेधत होते.
 नंतर मुलींनी *रांगोळी* काढण्याचा आनंद घेतला.

*आज दि-१५/१०/२०१६
*गरबा नृत्य,फुगडीचे*  संध्याकाळी आयोजन करण्यात येऊन
*आजचा भुलाबाईच्या गीतांचा शेवटचा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा* दिवस आनंदात साजरा झाला.
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
*✍🏻शब्दांकन-*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
✨☄✨☄✨☄✨☄✨