Friday, 30 September 2016

माझी शाळा माझेउपक्रम-इ.१ली-विषय-भाषा-चित्रा वरुन गोष्ट सांगणे

☄☄☄☄☄☄☄☄☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*---------------------------*
*उपक्रम-*
*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे समुह*🏅

*उपक्रम-चित्रावरुन गोष्ट तयार करणे.*

*इयत्ता -दुसरी*

पाठ-१ला  पान.नं-१

*हत्तीने वाचवले*

*चित्र पहा.गोष्ट सांगा.*

एका जंगलात खूप प्राणी ,पक्षी राहत होती.
त्या जंगलात मोठे प्राणी लहान-लहान प्राण्यांची शिकार करायचे,
त्यांना मारुन खायचे व आपले पोट भरायचे,
एकदा तीन ससे भावंड फिरायला निघाली,
फिरता फिरता ती नदी काठी असलेल्या झाडाखाली मऊ मऊ गवतावर खेळत होती,

ती ससे भावंड खेळण्यात खूप रमली असतांनाच तिकडून कोल्ह्याची स्वारी जात होती.

कोल्ह्याचे अचानक झाडाखाली खेळत असलेल्या ससे भावंडांकडे लक्ष  गेले,

*तो मनाशीच म्हणाला,*
'वा व!खूप छान शिकार सापडली,आज लुशलुशीत जेवण करायला मिळेल .'

कोल्हा ससे भावंडांना पकडण्यासाठी झडप घालणार तेवढ्यात ससे भावंडांचं त्याच्याकडे लक्ष गेलं,
आणि ती ससे भावंड जीवाच्या आकांताने पळत सुटले,

तेवढ्यात त्यांना एक हत्ती नदीत उभा असलेला दिसला,

हत्ती नदीवर आपली आंघोळ करण्यासाठी आला होता.

हत्ती सोंडेत पाणी भरुन अंगावर टाकून आंघोळ करत होता.

ससे भावंडांनी जोरात ओरडून आवाज दिला.

*'हत्ती दादा,हत्ती दादा आम्हाला वाचवा.'*

*हत्ती म्हणाला,*'का रे पिलांनो काय झाले ?'

*'हत्ती दादा ,हत्ती दादा*,आम्हाला लबाड कोल्हा बघ खाण्यासाठी पकडतोय.'

*हत्ती म्हणाला,*'पिलांनो,घाबरु नका येऊ द्या त्याला बघा,कशी अद्दल घडवतो.'

हत्तीने ससे भावंडांना आपल्या सोंडेत धरुन पाठीवर बसविले.
तेवढ्यात कोल्हा तेथे आला,

तो नदीजवळ येताच हत्तीने आपल्या सोंडेंत पाणी भरुन कोल्ह्यावर जोरात उडवायला सुरुवात केली,

त्यामुळे कोल्हा घाबराला व तेथून  माघारी धूम पळत सुटला,

जेव्हा हत्ती आपल्या सोंडेंने पाणी उडवत होते,तेव्हा ससे भावंडांना खूप मजा वाटत होती.

अशा प्रकारे हत्तीने ससे भावंडांचा जीव कोल्ह्याची शिकार होण्यापासून वाचवले.

*गोष्टीला नवीन शिर्षक देण्यात आले-*

१)हत्तीने कोल्ह्याला घडवली अद्दल

२)ससे भावंडांनी वाचवले स्वतःचे प्राण

*गोष्टीतून बोध-*

*संकट समयी जो कामास येतो तो खरा मित्र*

*---------------------------*
*✍🏻 शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

No comments:

Post a Comment