Friday, 30 September 2016

सुविचार

*दैनिक टाचणावर लिहीण्यासाठी 300 अनमोल सुविचार*


१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
२१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२) अतिथी देवो भव ॥
२३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
२४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
२६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

   
५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
८० प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
९६) अंथरूण बघून पाय पसरा.
९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
१००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच
१०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
१०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
१०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
१०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
१०५) विद्या विनयेन शोभते ॥
१०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
१०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
१०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
१०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
१११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
१२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
१२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
१२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
१२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
१२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
१२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
१२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
१२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
१२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
१३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
१३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
१३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
१३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
१३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
१३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
१३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
१३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
१४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
१४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
१४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
१४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
१४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
१४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
१४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
१४८) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
१४९) जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.
१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.
१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
२०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.
२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
२२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
२५१) आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
२५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
२५३) पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
२५४) आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
२५५) अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
२५६) मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
२५७) नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
२५८) अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
२५९) सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
२६०) शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
२६१) गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
२६२) दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे.
२६२) एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
२६३) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
२६४) पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
२६५) स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
२६६) अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
२६७) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
२६८) स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
२६९) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
२७०) क्रोध माणसाला पशू बनवतो.
२७१) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
२७२) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
२७३) जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
२७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
२७५) परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
२७६) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
२७७) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
२७८) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
२७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
२८०) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
२८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
२८२) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
२८३) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
२८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
२८५) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
२८६) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
२८७) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
२८८) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
२८९) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
२९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
२९१) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
२९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
२९३) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
२९४) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
२९५) न मागता देतो तोच खरा दानी.
२९६) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
२९७) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
२९८) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
२९९) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
३००) ........

इ.४थी-विषय-मराठी-कांगारु व पिलू संवाद

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*कांगारु व तिचे पिलू संवाद*

*कांगारु*-पिला कुठे गेला होतास मला न विचारता.
*पिलू-*अग आई इकडेच तर होतो.
*कांगारु*-अरे हळू ,अशी टणकन् उडी मारतोस.
*पिलू*-अग,मला मजा येते.
ये आई एक विचारु का?
*कांगारु-*विचार बाळा .
*पिलू-*आपल्याच पोटाला का अशी पिशवी आहे?
*कांगारु-*अरे देवानेच आपली रचना अशी केली आहे,
बघ कसा मजेत बसलायस तू.

आणि तुझ्या हे लक्षात आले का,की आपले दोन पाय लहान व दोन पाय मोठे आहेत.
*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

माझी शाळा माझे उपक्रम-रक्षाबंधन-वृक्षबंधन

जि.प.केंद्रशाळा,भालेर
ता.जि.नंदुरबार
रक्षाबंधन आनंदसोहळा
इ.४थीच्या मुलांनी केले नियोजन.

आज मुलं व मुली खूप खूश होती,
कारण शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम
घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे सर्व मुलींनी राख्या घरुनच आणल्या होत्या,
खाऊ मात्र शाळेकडून होता बरं,
मुलींनी शिक्षकांसह मुलांना राख्या बांधल्या,
पारंपारिक रितीरिवाजा प्रमाणे....

कार्यक्रमाचे
विशेष म्हणजे सर्व मुला मुलींनी आताच रोपण केलेल्या रोपट्यांना वाढविणे ही जबाबदारी घेत ,त्याच छोट्या रोपट्यांना राख्या बांधल्या.....

कार्यक्रम यशस्वीतेसाठी इ.४थी वर्गशिक्षक -श्री.पंकज वानखेडे सर
व विद्यार्थी
सहकार्य-श्री.रामराज गायकवाड सर
नियोजन-मुख्याध्यापक-
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार

माझी शाळा माझे उपक्रम-इ.१ली-पाहुणा ओळखा

☄☄☄☄☄☄☄☄☄

🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*----------------------------*
*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे*🏅
*---------------------------*
*उपक्रम*-
*पाहुणा ओळखा*
*---------------------------*
*निष्पत्ती*-
१)निरीक्षण शक्ती वाढते.
२)वेगळेपण समजते.
३)वर्गीकरण समजते.
४)आकारांचे दृढीकरण होते.
५)वाचन पूर्वतयारी
६)वाचन लेखनाची दिशा -डावी कडून उजवीकडे -
याचा सराव होतो.
७)शब्दसंग्रह वाढतो.
८)अभ्यासात मनोरंजकता येते.
*----------------------------*

🐪🐘🐄🐓🐐🐑🐎🐃🐕

🐓🦃🕊🐎🐓🦃🕊

🐋🐊🐳🐜🐡🐬🐠🐢

🌸🌻🌷🍀🌺🌼🌹

🍎🍊🍏🍐🌻🍒🍇🍓🍑

🌺🌻🌸🍎🌷🌼🌹

🐳🐋🐊🐢🐘🐠🐡🦀

🎄🌲🌷🌳🌴🌵

🌿☘🍀🌸🌾🍂🍃

🏏🏸🏒✈🏑🏹🎿

🚎🚌🚙🚐🚀🚛🚍🚖🚛

⛴🚤🚁⛵🛥⛴

✈🛫🚁🚌🚀🛩✈

🏫🏩🏥🏡🏨🏫🏰🏪

🖥💻🖨🏠📷📻📷☎

1⃣2⃣3⃣ 🅱5⃣6⃣9⃣

🅱🆎🆑9⃣🚾🅿🅰

🇹🇫🇫🇴🇪🇬🇪🇷📩🇧🇹🇦🇲🇦🇹🇦🇬

*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

चित्रपोस्ट ,symbol  बरोबर येत नाही,

माझी शाळा माझेउपक्रम-इ.१ली-विषय-भाषा-चित्रा वरुन गोष्ट सांगणे

☄☄☄☄☄☄☄☄☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*---------------------------*
*उपक्रम-*
*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे समुह*🏅

*उपक्रम-चित्रावरुन गोष्ट तयार करणे.*

*इयत्ता -दुसरी*

पाठ-१ला  पान.नं-१

*हत्तीने वाचवले*

*चित्र पहा.गोष्ट सांगा.*

एका जंगलात खूप प्राणी ,पक्षी राहत होती.
त्या जंगलात मोठे प्राणी लहान-लहान प्राण्यांची शिकार करायचे,
त्यांना मारुन खायचे व आपले पोट भरायचे,
एकदा तीन ससे भावंड फिरायला निघाली,
फिरता फिरता ती नदी काठी असलेल्या झाडाखाली मऊ मऊ गवतावर खेळत होती,

ती ससे भावंड खेळण्यात खूप रमली असतांनाच तिकडून कोल्ह्याची स्वारी जात होती.

कोल्ह्याचे अचानक झाडाखाली खेळत असलेल्या ससे भावंडांकडे लक्ष  गेले,

*तो मनाशीच म्हणाला,*
'वा व!खूप छान शिकार सापडली,आज लुशलुशीत जेवण करायला मिळेल .'

कोल्हा ससे भावंडांना पकडण्यासाठी झडप घालणार तेवढ्यात ससे भावंडांचं त्याच्याकडे लक्ष गेलं,
आणि ती ससे भावंड जीवाच्या आकांताने पळत सुटले,

तेवढ्यात त्यांना एक हत्ती नदीत उभा असलेला दिसला,

हत्ती नदीवर आपली आंघोळ करण्यासाठी आला होता.

हत्ती सोंडेत पाणी भरुन अंगावर टाकून आंघोळ करत होता.

ससे भावंडांनी जोरात ओरडून आवाज दिला.

*'हत्ती दादा,हत्ती दादा आम्हाला वाचवा.'*

*हत्ती म्हणाला,*'का रे पिलांनो काय झाले ?'

*'हत्ती दादा ,हत्ती दादा*,आम्हाला लबाड कोल्हा बघ खाण्यासाठी पकडतोय.'

*हत्ती म्हणाला,*'पिलांनो,घाबरु नका येऊ द्या त्याला बघा,कशी अद्दल घडवतो.'

हत्तीने ससे भावंडांना आपल्या सोंडेत धरुन पाठीवर बसविले.
तेवढ्यात कोल्हा तेथे आला,

तो नदीजवळ येताच हत्तीने आपल्या सोंडेंत पाणी भरुन कोल्ह्यावर जोरात उडवायला सुरुवात केली,

त्यामुळे कोल्हा घाबराला व तेथून  माघारी धूम पळत सुटला,

जेव्हा हत्ती आपल्या सोंडेंने पाणी उडवत होते,तेव्हा ससे भावंडांना खूप मजा वाटत होती.

अशा प्रकारे हत्तीने ससे भावंडांचा जीव कोल्ह्याची शिकार होण्यापासून वाचवले.

*गोष्टीला नवीन शिर्षक देण्यात आले-*

१)हत्तीने कोल्ह्याला घडवली अद्दल

२)ससे भावंडांनी वाचवले स्वतःचे प्राण

*गोष्टीतून बोध-*

*संकट समयी जो कामास येतो तो खरा मित्र*

*---------------------------*
*✍🏻 शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

इ.४थी-विषय-भाषा-चिमणी व पिलू संवाद

☄☄☄☄☄☄☄☄☄
*चिमणी व पिलू यांचा संवाद*

*चिमणी-*चिमण्या मी येते रे ,तुझ्या साठी जेवण घेवून.
*चिमण्या-*हो ग आई,मला खूप भूक लागलीय.

*चिमणी-* पण ऐक खाली उडी मारायचा प्रयत्न करु नकोस लहान आहेस अजून तू.

*चिमण्या-*ये आई ,मला कधी उडता येईल गं ?
*चिमणी-* येईल हो बाळा,
तुझे पंखांचा विकास झाला की.

*चिमण्या-*ये आई ,ऐक ना ! आपले नातेवाईक खूपच कमी दिसतात,
कुठे गेले ग सारे ?
*चिमणी-*हो ना ,याचेच तर दुःख आहे रे बाळा,
नंतर आपण ही राहू की नाही .

*चिमण्या-*मी तुला हे विचारुन दुःख दिले का ग ,सांग ना !
*चिमणी-*अरे बाळ हेच सत्य आहे,पण काही करु शकत नाही,
जे काही करायचे ते मानवाला करायचेय,
तेच आपले रक्षण करु शकतात.

*चिमण्या-*करतील का ग ते आपलं रक्षण?
*चिमणी-*हो रे बाळा ,प्रचार सुरु आहे,
आपल्या साठी घरट ही ठेवत आहेत सगळी,
त्यांच्या प्रयत्नांना यश येवो.

*चिमण्या-*का ग आई,
आपली घरटी कमी होत आहेत का?
*चिमणी-*हो रे चिमण्या,
वृक्षतोड होतेय,
त्या मानाने वृक्षलागवड ,वृक्षारोपन,वृक्षसंवर्धन होत नाही ये,
मग सांग बर आपल्याला घर कसे राहिलं ?
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

इ.४थी-विषय-मराठी चित्र पाहून संवाद लेखन-मासा व पिलू

☄☄☄☄☄☄☄☄☄

*मासा व पिलू संवाद*

*मासा-*चल पिला आपण फिरायला जावू.
*पिलू-*कुठे ग मछली आई.

*मासा-* अरे पिला कुठे जाणार, पाण्यातच फिरु या,
बघू कोण कोण नवीन शेजारी आले आहेत.
*पिलू-*आपण पाण्याबाहेर नाही का ग जावू शकत?

*मासा-*नाही बर,बाळा पाण्याबाहेर जायचा विचार ही मनात आणू नको,
*पिलू-*का ग असे सांगतेस ?

*मासा-* बाळा पाण्यातच आपण जिवंत राहू शकतो,
बाहेर गेलो तर तडफडून मरुन जावू.
*पिलू-*अरे बापरे !
हो का ग ! बरे झाले सांगितलेस ,नाहीतर मला नेहमी वाटत की ,आपण पाण्या बाहेरच्या जगात जावून बघावं.

*मासा-*आणि हो मच्छिमार आपल्या अंगावर भले मोठे जाळे टाकतो, व आपल्याला पकडतो.

*पिलू-*पकडून विनाकारण का छळतात ते आपल्याला,
आपण काय केलं गं त्यांचे ?

*मासा-*ते आपल्याला बाजारात जावून विकतात,
व पैसे मिळवतात.
*पिलू-*माणसे आपल्याला का विकत घेतात?
*मासा-*आपली निघृण हत्या केली जाते व आपण त्याचे भोजन बनतो.
*मासा-*असे आपण त्यांचे भक्ष्य बनतो.
*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

ज्ञानरचनावादी उपक्रम-संवादाचे सादरीकरण-पाठ्यपुस्तक-बालभारती-इ.१ली तील पाठातील संवाद नियोजन

☄☄☄☄☄☄☄☄☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*----------------------------*
*संवाद-*
*संवादाविषयी थोडक्यात -*
विद्यार्थ्यात संवाद कुठे वा कसा घडवून आणायचा या बाबत पाठ्यपुस्तकाचा करु या अभ्यास-
*आपल्याकडून काही गोष्टी सुटून मुल मागे राहू नये यासाठी,*
*---------------------------*
*निष्पत्ती*-
*विद्यार्थ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीला संधी,

*कल्पनाशक्तीला वाव,

*विद्यार्थ्यातील कला कौशल्य विकासास पुरक-

*नाट्यीकरणासाठी उपयुक्त

*मुलांत येणारा सभाधीट पणा,
*---------------------------*
*इ.१ ली*

*विषय-भाषा*

*पाठ-२ रा*
*पान.नं.३* वरील
जिंकलं कोण ?
यात ससा व कासव आपसात काय बोलत असतील त्यांचा संवाद
*पाठ-४ था*
आपला परिसर
यात चित्रातील प्रसंग -यांच्यातील संवाद
*पाठ-६ वा*
कोल्ह्याला द्राक्षे.......
यातील चित्रात एकमेकात होणारा संवाद
*पाठ-११ वा*
*पान.नं.१५*---
प्राण्यांच्या गमती जमती
यात प्राण्यांचे मुखवटे घालून (हालचाली,आवाज काढणे)
व या द्वारे एकमेकांशी संवाद साधणे,
*पाठ-१४*--
*पान.नं.२४*
उघड्यावरचा खाऊ
यात पाणी पुरी वाला व मुले यातील
व  डॉ. व पेशंट यातील संवाद
*पाठ-१६*
*बाळाचे दोस्त*
यात पक्ष्यांचा एकमेकांशी होणारा संवाद
मुलं त्यांच्या कल्पने प्रमाणे संवाद करतात.
*पाठ-१७*
झुई झुई झोका----
*पान.न.३२*
यात खेळ,प्रसंग,संवाद
या विषयी
*पाठ-२०*----
चला सहलीला......
यात चित्रात काय दिसते व त्यांच्यात काय संवाद होत असेल..
*पाठ-२४*--
ऊठ मुला !
येथे दिलेल्या चित्रात -आई व मुलगा यांच्यातील संवाद
*पाठ-२८*---
माझा शब्दसंग्रह-८
चित्रातील मुले आपसात काय बोलत असतील ,त्याचा संवाद
*पान.नं.६१*
यात चित्रातील जिराफ व गाढव यांच्यात होणारा संवाद
*पाठ-३०* ---
कोठे,काय ?
यातील चित्र दाखवून चित्रात होणारा -संवाद-काय असेल
*पाठ-३५* --
सण व उत्सव
सणाविषयी- चित्रावरुन संवाद
*पाठ-३७*---
कसे मिळेल पाणी ?
यात चित्रात कोण काय म्हणत असेल,या विषयी संवाद,
प्राण्यांचे संवाद घेऊन नाट्यीकरण-
*पाठ-३९*--
फुलसिंग आणि इवलेसे रोप यांच्यातील संवाद
*पाठ-४०*
गोष्ट एका घोड्याची
यात गाढव व घोडा यात संवाद व नाट्यीकरण
*----------------------------*
असा प्रवास करत मुलं इ.४थी पर्यंत संवाद व गोष्ट लेखनाकडे ....

पुढची इयत्ता क्रमशः
*---------------------------*
*✍🏻 शब्दांकन*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

माझी शाळा माझे उपक्रम-क्षेत्रभेट-कुंभार व्यवसाय-मुलाखत-बैल बनविणे-प्रात्यक्षिक

☄✨☄✨☄✨☄✨☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*🔸माझी शाळा माझा उपक्रम*
*🔹ध्यास आमुचा गुणवत्ता*
*जि.प.केंद्रशाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*
*---------------------------*
*🔹क्षेत्र भेट*
*🔸कुंभार व्यवसाय*
*🔹मातीकाम*
*🔸बैल बनविणे प्रात्य.*
*---------------------------*
दि-२२/०८/२०१६
वार-सोमवार

आता येत असलेल्या *पोळा* या सणाचे औचित्य-

*शाळेतील सर्व मुलांना  कुंभाराकडे घेऊन गेलो.
आपण कुठे जातोय याची ही मुलांना उत्सुकता होतीच.

*तेथे गेल्यानंतर कुंभार बाबांनी मुलांना मातीचे बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.
मुलांनी ही ते प्रात्यक्षिक काळजी पूर्वक पाहिले व समजावून घेतले,

*या वेळी गावात ही लोकांनी आपण कुठे चाललात व का आलात हा प्रश्न विचारला*

*मुलं हे शिकल्यानंतर बाबांचा व्यवसाय कमी होईल,मुलचं घरोघरी बैल बनवतील*
लोकांच्या हे वाक्य जरा वेगळेच वाटले,पण त्यांना हे वेगळे होते.
त्यांना *क्षेत्रभेटीविषयी*सविस्तर सांगण्यात आले.
*बैल बनविण्याची कृती सांगण्यात व बाबांची मुलांनी घेतलेल्या मुलाखतीच्या प्रश्नांना बाबांसोबत त्यांचा नातू- दिपक- जो आमचा दुसरीचा विद्यार्थी आहे तो ही देत होता.*

बाबांसोबत दिपकही बैल बनविण्याची कृती करुन दाखवत होता.
बघा ,मला ही येते हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

सर्व मुल माझ्या घरी आले हा ही आनंद व मोठेपणा त्याला वाटत होता.
*मुलांनी बाबांना विचारलेले प्रश्न*
 व
*बाबांनी दिलेले उत्तर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*प्रश्न -*बाबा ही माती तुम्ही कुठून आणली?
*उत्तर-*तलाव व धरणा जवळून,
तेथिल गाळापासून बैल तयार करत आहे.
*प्रश्न-*बाबा या मातीत अजून काय काय टाकलेय ?
*उत्तर-*या मातीत राख टाकली जाते.
*प्रश्न-*या मातीत राख का टाकली जाते ?
*उत्तर-*कारण बनवलेल्या बैलांना तडे पडू नये म्हणून.
*प्रश्न-*हे सर्व बनवायला तुम्हाला कोणी शिकवलं?
*उत्तर-*माझ्या वडिलांनी, बाबांनी शिकवलं
*प्रश्न-*तुम्ही हे काम कधी पासून करता ?
*उत्तर-*माझे काळेचे पांढरे झाले तेव्हापासून.

*मुलांना उत्तर थोडं वेगळ वाटलं,त्यांना आम्ही शिक्षकांनी उत्तराचा अर्थ सांगितला.*
*प्रश्न -*हे बैल आपण किती रुपयाला विकता ?
*उत्तर-* १० रुपयाला पाच या प्रमाणे,
किंवा काही लोक धान्य ही देतात.
*प्रश्न -*तुम्ही किती बैल बनविलेले आहेत ?
*उत्तर-*एका घराला अकरा या प्रमाणे,
तीन गावं मिळून आहे,
जेवढी लोकसंख्या गुणिले ११ या प्रमाणे करा.
*---------------------------*
प्रात्यक्षिक व मुलाखत झाल्यानंतर ,
बाबांनी आपल्याला छान माहिती दिली व आपला वेळ दिला म्हणून,
इ.४थी च्या मुलीने बाबांचे आभार मानले.
*मुलांना क्षेत्रभेट नवीन होते,त्यांना आनंद झाला व वेगळे ही वाटले.
*लगेच पुढच्या क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍🏻शब्दांकन-व नियोजन-*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*सहशिक्षक*-
*श्री.रामराज गायकवाड सर
*श्री.पंकज वानखेडे सर
*जि.प.केंद्रशाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*
☄✨☄✨☄✨☄✨☄

माझी शाळा माझे उपक्रम-पाहूणा ओळखा

☄☄☄☄☄☄☄☄☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*----------------------------*
*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे*🏅

*उपक्रम-*
*पाहुणा ओळखा*
*---------------------------*

*क क क क ३ क क क क*

*म म म म भ म म म म*

*२ ५ ७ ४ प ५ ७ ३ ८*

*काका बाबा मामा तवा नाना आबा*

*कान नाक पाय डोळे गाल कपाळ*

*गुळ मूळ रुळ तीळ कुळ चुळ*

*मित्र चित्र सूर्य सत्र पत्र*

*वर्ग गर्व नम्र पर्व सर्व*

*चक्र वक्र ड्रम नम्र चंद्र*

*क्रम भ्रम प्रत ट्रक प्राण ग्रह*

*कृती पृथ्वी डॉक्टर मृदा वृषाली*

*कौरव गौरव चंदन दौलत मौन*

*कोळसा खोबरे नोकर  हौस लोकर  गोरख*

*प प प ब प प प*

*D K L b G R E*

*F N U 7 B D J*
*----------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

माझीशाळा माझे उपक्रम-असा केला अभ्यास

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

*माझी शाळा माझे उपक्रम*

*ध्यास आमुचा गुणवत्ता*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
*असा केला अभ्यास*
*बहुवर्ग अध्यापन*

*इयत्ता -पहिली*
*फ* अक्षराची ओळख,

*इयत्ता -दुसरी*
*फ-*अक्षराने सुरु होणारे शब्द
विद्यार्थ्यांनी
*फ-*अक्षराने सुरु होणारे शब्द सांगितले ,
लेखन केले.
फणी
फणस
फळा
फुल
फळ
फुगडी
फटाका
फडके
फुटाणा
फेब्रुवारी
फाईल
फेस
फरशी
फुलपाखरु
फुलदाणी

नंतर मुलांनी शब्दांचा वाक्यात उपयोग करण्यास सुरुवात केली पण

पहिला शब्द-
*फुगा-*
यात विद्यार्थ्यांनी फुग्या विषयी सर्व माहिती सांगण्यास सुरुवात केली.

*आम्ही फुगा उडवतो.
*मला फुगा आवडतो.
*फुगा बैलांना बांधतो.
*आमचा फुगा फुटतो.
*हवेत फुगा उडतो.
*आम्ही फुगे खेळतो.
*आपला फुगा कोणीही घेऊन जातं.
*फुग्याला आम्ही पकडतो.
*फुगे वेगवेगळ्या रंगाचे असतात.
*आम्ही फुग्याला आमच्या तोंडाने फुगवतो.
*फुगा झाडात अडकतो.
*फुग्यात हवा असते.

*शब्दांचे लेखन करतात*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*इयत्ता -*१ली
*फ-*फळ्याजवळ येऊन शब्दातील *फ* अक्षर ओळखून बोटाने दाखवतो.
लेखन सराव देवून लेखनास देतात.

*फळ्यावरील शब्द शिक्षकांच्या मागुन बोलतात.*

*---------------------------*
*इयत्ता -३री*
*कविता तयार करणे*
शिक्षकांनी मुलांना एक शब्द दिला,
त्याप्रमाणे यमक जुळणारा दुसरे शब्द मुलांनी सांगितले ,

*--------------पोळा*
*-------------सोहळा*
*-------------गोळा*
*-------------डोळा*
*-------------पोळा*

        *पोळा*
    आज आहे *पोळा*
किती छान हा *सोहळा*
   आम्ही झालो *गोळा*
फुग्यावर आमचा *डोळा*
आम्हाला आवडतो *पोळा*
*----------------------------*
*---------------फळा*
*--------------मळा*
*--------------पळा*
*--------------गळा*
*-------------लळा*

       *फळा*
काळा असतो *फळा*
आमचा आहे *मळा*
लवकर लवकर *पळा*
आम्हाला आहे *गळा*
देशासाठी *लळा*
*---------------------------*

*--------------शाळा*
*--------------माळा*
*--------------काळा*
*--------------बाळा*

*आमची शाळा*

आमची सुंदर *शाळा*
फोटोला घातली *माळा*
फळा असतो *काळा*
शाळेत ये रे *बाळा*
*---------------------------*
कवितांना शिर्षक मुलांनी सांगितले .
*--------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

माझी शाळा माझे उपक्रम- ८सप्टेंबर-आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन-निमित्त-शिक्षकदिन

🔹🏅🔸🏅🔹🏅🏅🔸🏅
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪

*माझी शाळा माझे उपक्रम*
*ध्यास आमुचा गुणवत्ता*

*जि.प.केंद्रशाळा,भालेर*
*ता.जि.नंदुरबार*
*----------------------------*
*८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिना निमित्त ,*

*शाळेत शिक्षकदिन(स्वयंशासित दिन)*
*---------------------------*
*शाळेत शिक्षक दिनात-
विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला.

*विद्यार्थी शिक्षकांनी विषयाची तयारी उत्तम करण्यात आली होती.

*त्यांचे आत्मविश्वासपूर्ण अध्यापनाचे काम चालू होते.

*इयत्ता -चौथी*

या वर्गातील विद्यार्थी शिक्षकांनी चक्क इंटरअँक्टिव्हचा वापर करुन अध्यापन केले.

*यात सुरुवातीपासून संपेपर्यंत त्यांनीच सर्व क्रिया केल्यात.

*पेन सिलेक्ट करणे,
*फाँन्ड सिलेक्ट करणे,
*कलर सिलेक्ट करणे,
*पेनचा वापर करुन करणे,

*राईटिंगसाठी विद्यार्थी सहभाग घेणे.

*राईटिंग पुसण्यासाठी रेझरचा वापर करणे,

*क्लिअर पेज करणे,

*ते सर्व सिस्टिम बंद करणे.

*या सर्व क्रिया ते स्वतः करत होते.

*पूर्ण कार्यक्रमात -उपस्थित*
*आदरणिय केंद्रप्रमुख -*
*श्री.वसंत पाटील सर*
यांनी ही मुलांच्या कृतीचे कौतुक केले.

*अचानक आमचे व्यवसाय बंधू-*
श्री.सुदाम पाटील सर,
जि.प.शाळा,नागसर,
ता.जि.नंदुरबार
यांनी भेट दिली,

*त्यांनीही पाहुन मुलांचे कौतुक केले.*

*मुलांनी त्यांची मुलाखत घेतली व त्यांचा परिचय करुन घेतला.

*विद्यार्थी शिक्षकांनीच आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.*

*शेवटीच्या समारोपाचे विद्यार्थी शिक्षकांनी नियोजन व सुत्रसंचलन केले,*

विद्यार्थ्यांनी आजच्या शिक्षकांविषयी आपले मत व्यक्त केले.

व विद्यार्थी शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
श्री.रामराज गायकवाड
श्री.पंकज वानखेडे
*जि.प.केंद्रशाळा,भालेर,*
*ता.जि.नंदुरबार*
🔹🏅🔸🏅🔹🏅🔸🏅🔹

संख्या वाचन/संख्या ओळख यासाठी उपक्रम-सांगा सांगा लवकर सांगा

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*माझी शाळा माझे उपक्रम*
*ध्यास आमुचा गुणवत्ता*
*---------------------------*

*संख्या वाचन /ओळख यासाठी उपक्रम*

*सर्व मुलांना संख्या कार्ड वाटून देणे,

*नंतर टाळी वाजवून मुलं म्हणतील-
*सांगा सांगा लवकर सांगा एका अंकाचे नाव सांगा*

*नंतर आपण किंवा वर्ग नायक एका मुलाचे नाव सांगतील,

ज्याचे नाव घेतले तो मुलगा आपल्या जवळील *अंककार्ड* वाचेल,

इतरांना ते *अंककार्ड* दाखवून तो *अंक* सर्वांकडून म्हणून घेईल,

सर्व मुलं तो *अंक* पाहतील व त्याच्या पाठीमागे बोलतील.

*या प्रमाणे सर्व मुलांची नावे घेवून अशी कृती करुन घेणे.*

*--------------------------*

*या प्रमाणे मूळाक्षर,*
*इंग्रजी अक्षर,*
*शब्द-इंग्रजी,*
*मराठी शब्द*
या प्रमाणे वाचन सराव घेणे.

*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

माझी शाळा माझे उपक्रम-संख्या वाचन/संख्या ओळख उपक्रम-संगित खुर्ची

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*माझी शाळा माझे उपक्रम*
*ध्यास आमुचा गुणवत्ता*
*---------------------------*

*संख्या वाचन /ओळख उपक्रम*

*यासाठी आपण संगितखुर्ची या खेळाचा वापर करु शकतो.*

*ते असे-*

*संगितखुर्ची* खेळतांना प्रत्येकाकडे *अंककार्ड* वाटप करणे,

ती *अंककार्ड* हातात घेवून *संगीत खुर्ची* सुरु करणे,

*संगित* थांबून *खुर्ची* सांभाळल्यानंतर जो *विद्यार्थी* बाहेर राहिल त्याने आपल्या हातातील *अंककार्ड* वाचणे,

इतरांना *अंककार्ड* दाखवून सर्वांकडून तो *अंक* म्हणून घेणे.

*--------------------------*
*या प्रमाणे अक्षर,शब्द,*
*इंग्रजी अक्षर,शब्द*
यांचे कार्ड वापरुन हा खेळ घेवू शकतो.
*---------------------------*

*या उपक्रमामुळे मनोरंजनाबरोबरच वाचन व दृढीकरण होते.*

*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

Thursday, 29 September 2016

माझी शाळा माझे उपक्रम--भुलाबाईचे आगमन यातून-श्रवणपूर्व विकास

🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*---------------------------*
*जि.प.केंद्रशाळा,भालेर,*
*ता.जि.नंदुरबार*

*माझी शाळा माझे उपक्रम*

*भुलाबाईचे आगमन*
*---------------------------*
*शाळेत सध्या भुलाबाईचे आगमन झालेय,*

*चिमुकल्यांनी हट्ट  करुन भुलाबाई शाळेत बसवलीय,*

*संध्याकाळी आरती,आरती व*
*खाऊची गडबड असते,*

*मुलींचे फर्मान मुलांना येवू द्यायचे नाही ,*

*पण मुलांनी ही आयडिया केली,*

*ते ही आपल्या सोबत खाऊचे डब्बे आणायला लागलेत,*

*या निमित्ताने मुलांनी प्रवेश मिळवला,*

*भुलाबाई म्हटली की डब्यातील खाऊ जिंकण्याची मजाच असते,*

*रोज ८/१० डबे खाऊचे जमा होऊ लागले,*

*प्रत्येकाच्या डब्यातील खाऊ ओळखण्याची स्पर्धा लागू लागली,*

*खाऊचे डबे वाजू लागले,*

*त्या सोबतच वर्गात सूर गुंजू लागलेत,*

*🏵भुलाबाई भुलाबाई खाऊच काय ? जिंकला नाही तर देऊच काय ?*

*पुन्हा पुन्हा ह्या ओळी म्हटल्या जाऊ लागल्या,*

*सर्वांना याचा रिदम आवडून,*

*सर्वांच्याच तोंडी त्या येवू लागल्यात,*

*गाणी पाठ होऊ लागलीत,*

*नकळत आवाज डब्यांचा उपक्रम सुरु होईन ,*

*श्रवण कौशल्यविकसनास पुरक वातावरण तयार झाले,*

*खाऊंचे नावे ऐकून शब्दसंपत्तीचा विकास होण्यास मदत,*

*मनोरंजक व आनंदी वातावरणामुळे उपस्थिती साठी ही मदत झाली.*

*--------------------------*
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷

Sunday, 25 September 2016

माझे काव्य माझी रचना

माझे काव्य माझी रचना
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
---------------------------
माझे काव्य माझी रचना
सौ.जया नेरे(पाटील)
नवापूर जि.नंदुरबार
------------------------------------------











अनुक्रमणिका--
१) सण हा पोळ्याचा
२) अमराठी कविता (आहिराणी गीत)
३) जाणूनी घ्या
४) लोकराजा (पोवाडा)-राजर्षी शाहू महाराज
५) मेरा देश महान-(देशभक्तीपर गीत)
६) झाडे लाव-(चित्रावरुन कविता )
७) शिक्षक
८)आयुष्य माझे
९)देवा घरची लेकरे सारी-(चित्रावरुन कविता )
१०)चला जाणू या जीवनकौशल्य
११)साई बाबा बोलो-(गुरुवारीय गीत रचना )
१२)आम्ही वारकरी-(भक्तीगीत रचना )
१३)संसार- (चित्रावरुन काव्यरचना )
१४)असे होते टिळक
१५)गरबा गीत -(अमराठी कविता--गुजराथी)
१६)आई आई जगू दे मला
१७)विरह
१८)ओळखा पाहू मी कोण -(विज्ञान गीत )
१९)अ आ आईची शाळा भरली
२०)मुंगी नेसली लाल साडी- (बालगीत )
२१)झरा वाहे झुळझुळ -(बालगीत )
२२)अंकगीत -(बाल गीत )


सण हा पोळ्याचा
धवळ्या न् पवळ्याची जोडी बघा सजली रे
अन् कशी ,मिरवणूक बघा  निघाली ||धृ||

गळ्यात घुंगुर माळ,
पाठीवर नक्षीदार झुलं,
रंगीबेरंगी गोंडे हे छान,
बघा शिंगे ही रंगली रंगानं,
जोडी निघाली बघा जोमानं,
कसा रुबाब आज पहा रं,
अन् सर्व गावात जल्लोष झाला रं ||१||

सर्व नाचती लहान थोर,
चौघडा हा वाजे घण घोर,
किती आहे हो त्यांचे उपकार,
बळीराजाचा तोच आधार, जिवाभावाचा मैतर तू रं
नाही कष्टाची त्याची सिमा रं
||२||

सर्व घरात गोड धोड अन्न,
सारे दिसतात बघा प्रसन्न ,
साजरा केला वाढदिवस छान,
केले पूजन अन् औक्षण,
नैवेद्य असे हो गोड पुरण,
त्याच्या कष्टाची ठेवा हो जाण रं,
अन् टिकवा मराठ मोळी शान रं ||३||

धवळ्या न् पवळ्याची जोडी बघा सजली रं,
अन् कशी, मिरवणूक बघा निघाली......
*----------------------------*
*✍??शब्दरचना--*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄
-------------------------------------------
अमराठी कविता
(अहिराणी गीत)

   *उना आखाजीना सण व माय*

उना आखाजीना सण व माय (२)
मना बंधूले संदेश धाडा व माय (२)
मना बंधू लेवाले उना व माय (२)
बांधा आमराईमा झोका व माय (२)
आम्ही झोका झोका खेयनुत व माय (२)
मन्या माहेर वाशीन बैणी व माय (२)
उनी गवराई मना घर व माय (२)
गवराईना गाना व माय (२)
शंकर उना लेवाले व माय (२)
मनी गवराई गयी सासर व माय (२)
दिना सांजोरीना पुडा व माय (२)
माले बापनी लीधी साडी व माय,
बंधूनी लीधी साडी,
मना माहेरले साखरनी गोडी व माय (२)

*उना आखाजीना सण व माय*
*---------------------------*
*✍??शब्दरचना*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार

---------------------------------------- *📝माझे काव्य माझी रचना*�
➖जाणूनी घ्या➖➖➖➖➖➖
फुलांप्रमाणे हसू सदा,
पाखरांप्रमाणे बागडू सर्वदा ||

डोळे नसून आम्ही डोळसं,
मनाचा आरसा अखेर सरस ||

हाता पायाने असू पांगळे,
बुध्दीने परी असू वेगळे ||

असू आम्ही मतीमंद जरी,
गती आमुची ठेवू तुमच्या परी ||

बधिर असू जरी कानाने ,
हृदयात झंकारी स्वर सुराने ||

देवाघरची लेकरे सारी,
न्याय असे तेथे बरोबरी ||

अपंग म्हणूनी नका हिणवू ,
आपण सारे बहिण भाऊ ||
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🙏 *शब्दरचना-*🙏
✍ *सौ.जया नेरे(पाटील)*
   जि.प.केंद्रशाळा,भालेर
        ता.जि.नंदुरबार
✍✳✍✳✍✳✍✳✍✳

--------------------------- --------------

✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🌀

       पोवाडा
      लोकराजा

चला चला हो करु या वंदन
लोकराजा तुला रं ||जी s जी s रं जी

दिलास आम्हा न्याय आणि
दिलीस आम्हा समता हो s
जन्मलास तू घाटगे घराण्यात
नाव तुझे यशवंत हो s
वडील तुझे आप्पासाहेब अन्
आई तुझी राधाबाई होsss||जी s जी s

बहुजन समाजात शिक्षण प्रसार अन्
शिक्षण केले मोफत न् सक्तीचे हो s
स्त्री शिक्षणाचा प्रसार केला अन्
केला जाती भेद हा दूर हो s
आंतरजातीय विवाहाला दिली मान्यता,
पुनर्विवाहाचा केला कायदा हो ss||जी sजीs.....

एकत्र केले शिक्षण अन्,
काढल्या शिक्षण संस्था होs
शेतकऱ्यांना कर्ज देणे अन्,
केला कृषिविकास हो s
'राजर्षी'ही पदवी अन्,
दलितांचे कैवारी होss||जीsजीs....

सामाजिक न्यायाचे महत्त्व जाणूया,
छत्रपतींना हेच वंदन हो s||जीsजीsरं जीs......
लोकराजा तू रं,शाहू राजा तू रं......जीs.....

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*✍🏻शब्दरचना*-
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
------------------------------------------〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌀✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🌀✍🏻🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
देशभक्तीपर गीत
मेरा देश महान

भारत SS मेरा देश महान||धृ||

भारत अपनी शान है यारो,
अपना देश महान ,
आझादी के लिये कितनो ने,
दी है अपनी जान ||१||

भारत SS मेरा देश महान ........

चलो पढेंगे,चलो लिखेंगे,
करेंगे अपना नाम,
तिरंगा अपना ऊँचा रहेंगा ,
करेंगे ऐसा काम ||२||

भारत SS मेरा देश महान.....

हम सब है भाई-भाई,
देकर ये संदेश महान,
कभी ना लढेंगे,ना झगडेंगे,
करेंगे कार्य महान ||३||

भारत SS मेरा देश महान........

स्वच्छ भारत नारा हमारा,
होगा पुरा देश सुनहरा,
अच्छाईसे होगा उजियारा,
सुजलाम्-सुफलाम देश हमारा||४||

भारत SS मेरा देश हमारा........

जायेगा बलिदान न खाली,
तिरंगा की करके रखवाली,
गायेंगे हम गीत-कव्वाली,
मनायेंगे ईद और दिवाली ||५||

भारत SS मेरा देश महान.........
भारत SS भारत SS,........
*-----------------------------*
*✍🏻शब्दरचना*
 व *स्वरबध्द केलयं*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*-----------------------------*
🔹�🔸🔹🔸🔹🌴🌿🌴🌿-----------------------------------------🌴🌿🌴

चित्रावरून कविता
*---------------------------------
        झाडे लाव
माणसा माणसा ,झाडे लाव |
टाकू नको रे, कुर्हाडीचा घाव ||

घरटे माझे मोडले तर |
मिळेल कसा,मज निवारा-घर||

नको होऊस तू क्रुर असा |
ज्ञानी असून तुझा हा ,विचार कसा ||

मित्र आम्ही,सारे होतोय नष्ट |
हा विचार करुनी, मनाला होतेय कष्ट ||

पशू-पक्षीआम्ही,शोधितसे निवारा |
तुझ्या तळी त्यांना ,मिळू दे सहारा ||

विचार कर,एकदा विचार कर |
पर्यावरणाचा ,एकदा विचार कर ||

झाडे लाव,झाडे जगव |
प्राणी मात्रांचे ,जीवन सजव ||

झाडे लावशील ,तू जेव्हा |
नटेल ही, वसुंधरा तेव्हा ||
*------------------------------*
*✒शब्दरचना*
*✍🏻सौ.जया नेरे (पाटील)*
*नंदुरबार*
*---------------------------------*
🌴🌿🌴🌿🌴🌿🌴�🏻
शिक्षक दिना निमित्त गीत रचना
    शिक्षक  

शिक्षकरुपी देवदूत आले,
जीवन आमुचे घडवून गेले ||

शिकलो नसतो ग,म,भ,न,
आले नसते अक्षर ज्ञान ||

ज्ञान पाजले अमृत जसे,
जीवन चिरंजीव  होतसे ||

शिकवण दिली समतेची,
मूल्य रुजवली जीवनाची ||

माणूस म्हणून घडलो आम्ही,
म्हणूनच सुखात जगलो आम्ही ||

ज्ञानाचे जणू भांडार होते,
मायेचा जणू सागर होते ||

माझ्या जीवन मंदिरात,
शिक्षकच माझे दैवत ||

नमन त्यांना सदा करतो,
भक्त होऊन पूजा करतो ||

*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*---------------------------*

*घरदार याचा विचार न करता,*
*व्यवसायाशी एकनिष्ठ राहून,*
*तळमळीने काम करतांना,*
*स्वतःला झोकून देणाऱ्या ,*
*आपल्याजवळ जी शिदोरी आहे,*
*त्याचे सढळ हाताने दान करुन इतरांना शहाणे करुन सोडणार्या ,*

*माझ्या प्रिय गुरुमाऊलींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!*
*---------------------------*
*आजचा योग-*

*भाग्याच्या वाटेवरच्या अडचणी दूर करणारे श्रीगणेश यांचे आगमन*

*जीवनाच्या वाटेवर ज्ञानदान करुन जीवनातील काटे दूर करुन सुखी जीवनाचा मंत्र देणारे आपले गुरु,*यांचा मानाचा दिवस !!

*श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!*
*---------------------------*
*✍🏻शुभेच्छुक*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏�

----------------------------------------
माझी रचना माझे काव्य
    आयुष्य माझे

*आले आयुष्यात माझ्या दुहेरी जगणे*
*तरीही असे माझे एकनिष्ठ वागणे,*

*दुहेरी वाट चालतांना मलाच लागला कस,*
*तरीही हातात काय राहिले एक धुसपुस*

*मनाची द्विधा कधी संपत नाही,*
*आयुष्यात नवीन सूर्य कधी उगवत नाही*,

*जगतांना भेटले नेहमीच*
 *तुलना करणारे जगात,*

*जीवन जगतांना राहिले एकनिष्ठ*
*तरी ही सगळ्यात  मी कनिष्ठ,*

*युगामागुन युगे जाती,*
*बघतील सर्व मजकडे एक ही युवती,*

*जोवर कष्टाची जाणीव होत नाही माझ्या ,*
*तोवर नैराश्यच असेल वाटेवर माझ्या,*
*---------------------------*
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार



------------------------------------------

चित्रावरुन कविता
*----------------------------*
देवाघरची लेकरे सारी

देवाघरचीच तर सारी लेकरे,
तरी देवा माणसात असे भेद का रे ?

कुणी राही रस्त्यावर तर,
कुणी राही महालात ||

कुणी निजे मऊ बिछान्यात तर,
कुणी निजे जमिनीवर ||

कुणी वाढावा श्रीमंताच्या घरात तर,
कुणी गरीबाच्या झोपडीत ||

देवा बघ तर त्यांच्या हाती दप्तर तर,
आमच्या हाती कचरा पोती ||

एकाच देवाची लेकरे सारी तरी,
आमच्यात का ही अशी खोल दरी ||

देवा तुझ्या दारी न्याय दे,
सर्वांनाच बरोबरीने जगू दे,

आम्हाला ही वाटते देवा,
शाळेत जावं,खूप शिकावं ||

पण जग हे अश्या,
 सुखदुःखाने भरलेलं,
कुठे दिवाळी तर,
कुठे होळी हे ठरलेलं ||

*----------------------------*
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*सदस्या-काव्यप्रेमी शिक्षकमंच समुह*
*----------------------------*
�🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
-----------------------------------------
*�
    गीत रचना
चला जाणू या जीवन कौशल्य

चला बाई चला शाळेला चला,
जीवन कौशल्य ही जाणू चला,
अगं शिला,अगं राजी,
कशाला राहतेस घरी,
घरी चल शाळेवरी ||धृ||

शाळा समजून घेवू या,
वाचून शहाणं होऊ या,
शिकायची आहे आता ,
शिकायची आहे,
जीवन कौशल्य ही,
शिकायची आहे २, ||१||अगं शिला......

स्वतःची ओळख करु या ,
आवड ,उणीवा जाणू या,
त्यांचा विकास करु या,
'स्व'ची जाणीव,कौशल्य भारी २, ||२||अगं शिला....

सुख दुःखे ही जाणू या ,
जाणून कृतीत उतरवू या ,
समान अनुभूती घेऊ या,
बोलायची नाही फक्त कृती करायची २,||३||अगं शिला.......

योग्य ,अयोग्य समजू या,
समजून जगाला पटवू या,
ऐकून बदल करु या,
परिणाम कारक संप्रेषण हे,
चला चला घडवू या २,||४||अगं शिला.......

आपण सारे एक हो,
नाही कुणात भेद हो,
समस्या जाणून घेवू या,
त्याचे निराकरण करु या,
चिकित्सक विचार काळाची गरज,२,||५||अगं शिला........

मामाचं लग्न,परिक्षा ही आहे,
मनाचा गोंधळ हा होत आहे,
करावं काय आता करावं काय,
निर्णय क्षमता वाढवू या,२,||६||अगं शिला......

शाळेतून समाजात,समाजातून गावातं,शांतीचा संदेश देऊ या,
व्यक्ति -व्यक्तितील संबध घडवू या,
गावाचा विकास करु या,२,||७||अगं शिला......

एकमेकांची दुःखे वाटू या,
आनंदात सहभागी होऊ या,
भावनांचे समायोजन करु या,
ताणांचे समायोजनन करु या,२,||८||अगं शिला.....

करायचे आहे हो करायचे आहे,
नवीन नवीन गोष्टी करायच्या आहे,
नवनवीन संकल्पना राबवायच्या आहे,
नवनिर्मितीचा आनंद घ्यायचा आहे,२,
 ||९|| अगं शिला.......
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*✍🏻 शब्दरचना*

*सौ.जया नेरे (पाटील)*
*नंदुरबार*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
------------------------------------------


गुरुवारीय गीत रचना
     गीतरचना
    साई बाबा बोलो

साई बाबा बोलोSS ,शिर्डी वाले बोलो SS

आलो तुझ्या भेटीला,
चरणी माथा ठेविला,
कृपा करी तू आम्हावरी ||

साईबाबा SS शिर्डी वाले बाबा SS

राहिलास कुटीत,
साध्या तू वेशात,
बेसन भाकरी प्रसाद हा भारी चवीने खाई भक्त तुझ्या दरबारी ||

साईबाबा SS शिर्डीवाले बाबा SS

अंगावरी शाल,
डोक्याला  रुमाल
हातात काठी,
राही दीन दुबाळ्याशी ||

साईबाबा SS शिर्डीवाले बाबा SS

लावलेस दिप,
तुझ्या दिव्यत्वाने,
उजळली सारी शिर्डी नगरी,
भक्तांची ही गर्दी असे गुरुवारी ||

साईबाबा SS शिर्डी वाले बाबा SS

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार

-----------------------------------------


भक्तीगीत रचना
आम्ही वारकरी  

विठ्ठल विठ्ठल जय हरी,
करत दुमदुमली पंढरी ||
आज मागणे हेच ,तुझ्या दारी,
सुखी होऊ दे,जनता सारी||
कृपा असू दे ,आम्हा वरी,
 ये धावूनी हाके वरी ||
संतांची भूमी ही ,आपली नगरी,
ग्यानबा,तुकोबांचे अभंग, म्हणती सारी ||
कर कटेवरी ठेवूनी ,पाही तू दुनिया सारी,
आले भेटीला ,दुःख घेऊनी  वारकरी ||
अंकुर फुलू दे,होऊ दे आबादानी सारी ,
दुथडी भरु दे,वाहू दे नदी,नाले,विहिरी ||
विठ्ठल विठ्ठल जय हरी.....||||
*--------------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸�
-------------------------------------------





-----------------------------------------
लोकमान्य टिळक यांना कोटी कोटी वंदन
असे होते टिळक

*-----------------------------*
*एक होते टिळक,गुण त्यांचे ठळक*,

*ते खरे बोलायचे,बोलल्या प्रमाणे वागायचे*,

*त्यांचा पोशाख पूर्वीचा,अंगात अंगरखा असायचा,*

*डोक्यावर पगडी सोनेरी छान,*
*लोकमान्य पदवी ने दिला मान*,

*इंग्रजांना हाकलून द्या,लोकांना ते सांगू लागले*,
*---------------------------*
*मराठा,केसरीने केली जागृती,*
*गणशोत्सवातून सारे गोळा होती,*

*'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क'*
*सिंहगर्जना होती त्यांची*

*रत्नागिरी च्या चिखलीतून* ,
*जन्मले बाळ पार्वतीबाईंच्या उदरातून,*

*गंगाधर हे वडिल तयांचे*,
*बीज रोवले स्वातंत्र्याचे,*

*असा मिळाया नेता आम्हा,भाग्य लाभले देशाला,*

*आज तयांना करु कोटी वंदन,करुनी त्यांचे नित्य स्मरण,*
*----------------------------*�
�लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
*-----------------------------*
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*-----------------------------*
🌷🍃🌷🍃�

�🍃🌷🍃

🌷
---------------------------------------+

अमराठी गीत रचना
(गुजराथी)
गरबा गीत

माँ तारा गरबा रमिये रे,
चालो,आयवी नवरात्री ||

माँ तारी आरती गाईये छे,
चालो,आयवी नवरात्री ||

माँ तारी पूंजा करता छे,
चालो,आयवी नवरात्री ||

माँ अमे दांडिया रमिये रे,
चालो,आयवी नवरात्री ||

नव माँ ना नवरात्री,
आयवी हुँ तो गरबा रमवा ||

नव दिवसना नवज्योती,
आयवा अमे गरबा रमवा ||

अमे गड पर मळवा आयवा,
चालो,आयवी नवरात्री ||
*----------------------------*
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
*----------------------------
अमराठी लेखन एक प्रयत्न


-------------------------------------------
गीत रचना
आई आई जगू दे मला

सुंदर जग हे पाहण्याला ,
जन्मू दे ग आई मला ||

तुझ्या सारखी दिसेन मी,
तुझेच रुप हे असेन मी ||

नको मारु ग गर्भात मला,
 जगली जशी तू, तशी जगू दे मला||

फुलण्या आधी खुडू नको,
पाप असे तू करु नको ||

श्वास आहे ना ग मी तुझा,
मरेल मी जर थांबेल श्वास तुझा ||

मीच असेल आधार तुझा,
घात करु नको तू माझा ||

ओरडून सांगते जगाला,
जन्म घेऊ द्या हो मला ||

नाही जन्मले मी जर का,
सृष्टी वाढेल,फुलेल का? ||
*---------------------------*
✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
----------------------------------------

गीतरचना
   विरह

विरहात मी तुझ्या रे,
मी न मी राहिले,
तुझ्या विना सख्या रे,
हे जीवन व्यर्थ झाले ||

काय केला गुन्हा मी,
हे न कळले मला ,
मिळाल्या वेदना मला,
आठवणीत तुझ्याच रे ||

जखमांची केली सोबत,
राहिले घायाळ मी,
तू न भेटला कधी,
तू न दिसला कधी ||

विरह हा जीवनात,
ना कधी कुणास मिळो,
ना दुःख भोगण्यास हे,
कुणी ना कधी बळी पडो ||

आताही गात आहे रे,
विरहाचेच गीत तुझे,
विरहाचे सूर आणि,
विरहाचेच संगीत तुझे ||

✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार
----------------------------------------
विज्ञानगीत🔸🔹🔸
ओळखा पाहू मी कोण

नवे नवे शोध लावतो,
तंत्रज्ञानात प्रगती करतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

औषधांचा शोध लावतो,
नवीन नवीन उपचार करतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

अंध्दश्रध्दा दूर करतो,
शास्त्रीय कारण मी देतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

प्रयोगशाळेचा वापर करतो,
रसायनांचा शोध लावतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

जीवांचा अभ्यास करतो,
त्यावर अनेक संशोधन करतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

रहस्यांचा शोध लावतो,कठीण प्रश्नाची उकल करतो,
*ओळखा पाहू मी कोण?*

*अरे बाळांनो, मी तर आहे विज्ञान*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍🏻शब्दरचना*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🔸




🔹🔸🔹🔸�📝📚📝📚📝📚📝📚📝📚

माझी शाळा माझे उपक्रम

*🎯ध्यास आमुचा गुणवत्ता*
---------------------------------------------------------------------------
      🇯  🇦 🇾 🇦      
🇳 🇪 🇷 🇪
 
 गीत रचना
अ आ आईची शाळा भरली

(विठ्ठल नामाची शाळा भरली या गीतावर आधारीत.....)

            *गीत*

अ आ आईची शाळा भरली
शाळा शिकतांना तहान भूक हरली ||धृ||

सानेगुरुजी हे पांडुरंग,
आम्हा शिकवी समतेचे अभंग,
लेखन-वाचनात होऊ दंग,
आय.एस.अधिकारी हे कसे बनली ||१||

बाळ गोपाळ होऊ शाळकरी ,
डोळे मिटून बघू शिक्षण नगरी,
कधी घडलं ज्ञानाची वारी,
हीच आशा मनात उरली ||२||

वही पुस्तक हाती घ्या रे ,
लिहू वाचू शिकू या रे ,
शिक्षणदिंडी ही बघती सारे,
युक्ती पुढे ही शक्ती हरली ||३||
---------------------------------------------------------------------------
  *🖋शब्दरचना*

सौ.जया नेरे (पाटील)
 *जि.प.केंद्रशाळा,भालेर*
 *ता.जि.नंदुरबार*
-------------------------------------
📝📚📝📚📝📚📝📚�

बालगीत रचना
मुंगी नेसली लाल साडी
मुंगीने नेसली लाल साडी,
घेतली तिने लाल गाडी,

फुला फळांची तिची वाडी,
साखर खाऊन झाली जाडी,

शिस्त मात्र कधी ना मोडी,
रांगेत चालते रस्ता ना सोडी,

शिकवण घ्या हो तिच्या कडून थोडी,
हार न मानी एकजूटीची तिला गोडी,

नका काढू तिची खोडी,
नाहीतर चावेल,येतील फोडी ||

सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
�--------------------------------------�
बालगीत रचना
झरा वाहे झुळझुळ
झरा वाहे झुळझुळ,
घुंगरांची चाले खुळखुळ,

भुंग्यांची ऐका भूणभूण,
बेडकाची उडी टुणटुण,

किडा करतो वळवळ,
पानांची असते सळसळ,

मोर नाचतो थुईथुई,
कोल्हा करतो कुईकुई,

पाऊस पडतो सरसर,
जाते वाजते घरघर,

घंटा वाजते टण टण,
फिरु नका कोणी वणवण||

सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार

------------------------------------------
बालगीत रचना
अंकगीत
एक सोंड हत्तीला,
सोंड हलवू या चला चला ||
दोन कान सश्याला,
हलवा कान चला चला ||
तीन तोंड दत्ताला,
आरती करु या चला,चला ||
चार पाय गायीला,
दूध देई पहा मला ||
पाच बोटे हाताला,
लागतात सर्व कामाला ||
सहा कोन षट्कोनाला,
एक एक मोजू चला ||
सात सूर पेटीला ,
सा रे ग म म्हणू चला ||
आठ काड्या छत्रीला,
पाऊस आला उघडा तिला ||
नऊ वाती समईला,
पूजेसाठी पेटवू चला ||
दहाची गमंत पाहू चला,
दशक झाले पहा पहा ||

*---------------------------
*✍🏻सौ.जया नेरे (पाटील)
नंदुरबार






*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे*🏅

*उपक्रम*

 *शब्दांचे शेवटी यमक साधून*

*कविता तयार करणे-*
*---------------------------*

       *चित्र*

जमले सगळे *मित्र*,
सगळ्यांनी काढले *चित्र* ,
त्यात रंग भरले *विचित्र*,
रंग केले सर्व *एकत्र*,
रंग सांडले *सर्वत्र,*

*---------------------------*
         *पत्र*

विष्णूला आले *पत्र,*
पत्रावर फिरले *नेत्र,*
घटना घडली *विचित्र,*
विष्णूचे वाचून भरले *नेत्र,*
सर्वांनीही वाचले *एकत्र,*
दुःख झाले *सर्वत्र ,*
पाण्याने डबडबले सर्वांचे *नेत्र,*
सोडून गेला सर्वांना तो आपलाच *मित्र,*
बातमी लगेच पसरली *इतरत्र,*
सर्वांनी विचार केला *एकत्र,*
एकमेकांना धीर दिला ते होते आपलेच *मित्र.*

*---------------------------*

     *गणपती उत्सव*

जमले होते सारे *मित्र,*
गणपती बसवला सर्वांनी *एकत्र ,*
सण असे हा खूप *पवित्र ,*
गणपतीला मिरवले *इतरत्र,*
गुलाल फेकला *सर्वत्र ,*
नाचले सारे *एकत्र ,*
गणपतीचे बारीक हो *नेत्र*,
पाहतो लुकलुक *सर्वत्र ,*
सर्वांनी दिले गणपतीला *पत्र,*
पाऊस येऊ दे बाप्पा *सर्वत्र*,
कृपादृष्टीने फिरव तुझे *नेत्र,*
नांदू दे सर्वांना *एकत्र ||*

---------------------------
✍🏻सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार

माझे काव्य माझी रचना

🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*---------------------------*
*देईल कोणी संरक्षणाची हमी ?*

निर्भिड पणे चालणे,
 झालेय मला अशक्य
निर्भिड पणे वागणे,
कसे होईल शक्य,

अजून ही डोळे ,
खुणावताय मला,
असुसल्या नजरेने ,
पाहताय मला,

जगण्याची हिम्मत ,
देईल का कोणी,
संरक्षणाची हमी,
घेईल का कोणी,

अजून किती मुली होतील,
अत्याचाराच्या बळी,
अजूनही त्यांच्या वाटेत,
येतील असेच वावटळी,

मुलगी असो कुणाची ही,
देऊ संरक्षणाची हमी,
या पुढे अशी बळी,
जाऊ नये कोणी,

चला सारे एक होऊ,
नेक कामासाठी पुढे येऊ,
धडा शिकवू नराधमांना,
हिम्मतीने तोंड देऊ...

माझ्या कडे पाहण्याचा,
बदलेल का दृष्टीकोन,
सर्वांकडून  मला ,
मिळेल का संरक्षण,

जय मानवता... 🙏🏻
*---------------------------*
*✍🏻 शब्दरचना*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
*---------------------------*
*---------------------------*

चित्रावरुन गोष्ट

☄☄☄☄☄☄☄☄☄
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*---------------------------*
*उपक्रम-*
*🏅गुरुकुल महाराष्ट्राचे समुह*🏅

*उपक्रम-चित्रावरुन गोष्ट तयार करणे.*

*इयत्ता -दुसरी*

पाठ-१ला  पान.नं-१

*हत्तीने वाचवले*

*चित्र पहा.गोष्ट सांगा.*

एका जंगलात खूप प्राणी ,पक्षी राहत होती.
त्या जंगलात मोठे प्राणी लहान-लहान प्राण्यांची शिकार करायचे,
त्यांना मारुन खायचे व आपले पोट भरायचे,
एकदा तीन ससे भावंड फिरायला निघाली,
फिरता फिरता ती नदी काठी असलेल्या झाडाखाली मऊ मऊ गवतावर खेळत होती,

ती ससे भावंड खेळण्यात खूप रमली असतांनाच तिकडून कोल्ह्याची स्वारी जात होती.

कोल्ह्याचे अचानक झाडाखाली खेळत असलेल्या ससे भावंडांकडे लक्ष  गेले,

*तो मनाशीच म्हणाला,*
'वा व!खूप छान शिकार सापडली,आज लुशलुशीत जेवण करायला मिळेल .'

कोल्हा ससे भावंडांना पकडण्यासाठी झडप घालणार तेवढ्यात ससे भावंडांचं त्याच्याकडे लक्ष गेलं,
आणि ती ससे भावंड जीवाच्या आकांताने पळत सुटले,

तेवढ्यात त्यांना एक हत्ती नदीत उभा असलेला दिसला,

हत्ती नदीवर आपली आंघोळ करण्यासाठी आला होता.

हत्ती सोंडेत पाणी भरुन अंगावर टाकून आंघोळ करत होता.

ससे भावंडांनी जोरात ओरडून आवाज दिला.

*'हत्ती दादा,हत्ती दादा आम्हाला वाचवा.'*

*हत्ती म्हणाला,*'का रे पिलांनो काय झाले ?'

*'हत्ती दादा ,हत्ती दादा*,आम्हाला लबाड कोल्हा बघ खाण्यासाठी पकडतोय.'

*हत्ती म्हणाला,*'पिलांनो,घाबरु नका येऊ द्या त्याला बघा,कशी अद्दल घडवतो.'

हत्तीने ससे भावंडांना आपल्या सोंडेत धरुन पाठीवर बसविले.
तेवढ्यात कोल्हा तेथे आला,

तो नदीजवळ येताच हत्तीने आपल्या सोंडेंत पाणी भरुन कोल्ह्यावर जोरात उडवायला सुरुवात केली,

त्यामुळे कोल्हा घाबराला व तेथून  माघारी धूम पळत सुटला,

जेव्हा हत्ती आपल्या सोंडेंने पाणी उडवत होते,तेव्हा ससे भावंडांना खूप मजा वाटत होती.

अशा प्रकारे हत्तीने ससे भावंडांचा जीव कोल्ह्याची शिकार होण्यापासून वाचवले.

*गोष्टीला नवीन शिर्षक देण्यात आले-*

१)हत्तीने कोल्ह्याला घडवली अद्दल

२)ससे भावंडांनी वाचवले स्वतःचे प्राण

*गोष्टीतून बोध-*

*संकट समयी जो कामास येतो तो खरा मित्र*

*---------------------------*
*✍🏻 शब्दांकन*-
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
☄☄☄☄☄☄☄☄☄

Thursday, 15 September 2016

उपक्रम-आवाज डब्या

♦इयत्ता -पहिलीसाठी♦  

        🔷श्रवण खेळ🔷
             
 🌷आवाज डब्या🌷

🔰साहित्य-
रिकाम्या हिंग डब्या,विविध धान्य जसे-हरभरा,वाटाणा,मुग,तिळ  इ.    
    
🍇सर्व विविध आकाराचे धान्य रिकाम्या हिंग डब्यात टाकायचे.    
           
  🍬मुलांना  त्या डब्या हलवून दाखवायच्या, व  त्यांना डबीत कोणती वस्तू असेल ते ओळखण्यास सांगायचे.......

💧अशा पध्दतीने मुलांना काळजीपूर्वक ऐकण्याची मुलांना सवय लागते.
              
✒शब्दांकन✒  
                    
 ..          
 📝 सौ.जया नेरे (पाटील)          
🎯जि.प.केंद्र शाळा,भालेर                      🐚ता.जि.नंदुरबार 🐚

Tuesday, 13 September 2016

माझी शाळा माझे उपक्रम-चॉकलेटच्या कागदापासून हार बनविणे.

माझी शाळा माझे उपक्रम-

🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
🇯🇦🇾🇦
        🇳 🇪 🇷 🇪
*----------------------------*
*माझी शाळा,माझे उपक्रम*

*जि.प.केंद्रशाळा,भालेर,*
*ता.जि.नंदुरबार*

*उपक्रम*-चॉकलेटच्या कागदा पासून हार बनविणे.

कार्यक्रमात चॉकलेट वाटले जातात ते कागद मुल तिथेच टाकून कचरा करतात,
म्हणून ते गोळा करुन हार बनविणे ही कृती करवून घेतली,
त्या मुळे कचरा ही होत नाही,
सर्व कागद जमवून ठेवतात,
मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो.

*साहित्य* -चॉकलेटचे कागद,
स्ट्रॉ ,दोरा,सुई.....

*कृती-* चॉकलेट च्या कागदाच्या उलट,सुलट घड्या करणे,

नंतर सुई दोरा घेऊन त्यात एक एक घडी केलेला कागद टाचून ओवणे,
अश्या तीन कागदाच्या घड्या उभ्या,आडव्या ,तिरप्या,ओवून फुल तयार करणे,

एका फुलानंतर स्ट्रॉचा तुकडा ओवणे,

अशी कृती पुन्हा पुन्हा केल्याने एक छानसा हार तयार होतो.

हा हार फोटोंना लावल्यास छान दिसतो,
*---------------------------*
*✍🏻शब्दांकन*
सौ.जया नेरे(पाटील)
नंदुरबार
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷